ओडिशामधील बालासोर रेल्वे अपघातामुळे मडगाव- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवा लांबणीवर पडली होती. २६ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवशी ५ एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. कोकण रेल्वेमार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला असून, मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत २६ जूनपासून सुरू होईल. या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड येथे थांबा देण्यात आला आहे. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वा. सुटेल. ठाणे ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, मडगाव दुपारी १.२५ अशा तिच्या वेळा असतील. मडगाव येथून वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी २.३५ वा. सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ ५.३५ आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वा. पोहोचेल.
भारतीय रेल्वे विभागाकडून पाच मार्गांवर वंदे भारत सेवा सुरू करण्यात येणार आहे. ५ वंदे भारत एक्स्प्रेस एकाच दिवशी सुरू करण्यात येणार आहे. २६ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये उपस्थित राहणार आहेत. भोपाळमधून दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. इतर तीन ठिकाणांहून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचं नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. मुंबई-मडगाव, बंगळुरू- हुबळी, पाटणा-रांची, भोपाळा-इंदोर, भोपाळ जबलपूर या पाच वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन होणार आहे. या पाचही वंदे भारत एक्स्प्रेसला ८ कोच असणार आहेत. यातून एकावेळी ५३० प्रवासी प्रवास करू शकतात.