27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeKhedपहिल्याच पावसात महामार्गावरील भरणेनाका जलमय

पहिल्याच पावसात महामार्गावरील भरणेनाका जलमय

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील मुख्य मार्गावर सकाळच्या सुमारास कोसळलेल्या पहिल्या पावसाने येथील परिसर जलमय झाला. त्यामधूनच वाहनचालकांनी वाहने हाकत प्रवास केला. त्यामुळे वाहतूककोंडीचाही सामना करावा लागला. या मार्गावरून खेड-दापोली-मंडणगड या तीन तालुक्यांत जाण्या- येण्यासाठी एकच मार्ग आहे. या ठिकाणी वाहन चालकांनी जलमय झालेल्या मार्गावरून माग काढत प्रवास केला. एकीकडे जलमय भाग तर दुसरीकडे वाहतूककोंडीचादेखील सामना करावा लागला. दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून जुना असलेला रस्ता योग्य प्रकारे न बनवला गेल्याने सतत वाहतूककोंडी होत आहे. त्यात आता पावसाच्या पाण्याची भर पडणार असल्याने भरणेनाका परिसर जलमय होऊन साचणाऱ्या पाण्याचा अडथळा होणार आहे. याकडे संबंधितांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular