27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunवाशिष्ठी गाळ उपशाला अखेर मुहूर्त….

वाशिष्ठी गाळ उपशाला अखेर मुहूर्त….

आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे.

शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. शंकरवाडी- मुरादपूर वाशिष्ठी नदी तीरावरील नलावडा बंधारा वाहून गेल्याने दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बंधाऱ्याच्या ठिकाणी पूरसंरक्षक भिंतीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. हे ठिकाण वाशिष्ठी नदीवरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या खालील बाजूस सुमारे १ कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी वाशिष्ठी नदीच्या पात्रास वळण तयार झाले आहे. नदीच्या वळणाच्या आतील बाजूस गाळ व वाळू साठलेली असून वळणाची बाहेरील बाजू दरवषीं पुराच्या पाण्याने खचत आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडा बंधारा) जुने दगडी बांधकाम पूर्वी केले होते; परंतु २००५च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले आहे.

त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात साडेनऊ कोटी त्यानंतर पाच कोटी निधी उपलब्ध झाला आहे. यावर्षी गाळ उपसा वाशिष्ठी नदीत राहिलेल्या भागात केला जाणार आहे. शंकरवाडी येथून वाशिष्ठी नदीचे पाणी चिपळूण शहरामध्ये सांस्कृतिक केंद्र, स्मशानशेड, वाणी आळीमार्गे शिवनदीला मिळते. हे पाणी शंकरवाडी येथे अडवल्यास या भागातील घरांना धोका पोहोचणार नाही तसेच वाशिष्ठी नदीचे पाणी शिवनदीकडे जाताना आजूबाजूला पसरल्याने शहरातील जी पाण्याची पातळी वाढते त्यास अटकाव होणार आहे. दरम्यान, मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे थांबलेली विकासात्मक कामे आता पुन्हा सुरू झाली असून, मंजूर झालेल्या कामांपैकी चिपळूण शहरातील पहिल्या नलावडा बंधारा कामाचा प्रारंभ होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular