संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गुरववाडी येथे घराशेजारी उभी असलेली बोलेरो मॅक्स गाडी आणि रिकामे सिलेंडर पळवून नेल्या प्रकरणी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यातुन प्राप्त झाली आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, याची तक्रार दत्ताराम धोंडू लिंगायत रा. देवरुख यांनी दिली आहे. यावरून पोलिसांनी पवन उदयकुमार मिरकर रा. जाकीमिऱ्या रत्नागिरी आणि अमित शंकर खडसोडे रा. झारणी रोड रत्नागिरी यांना ताब्यात घेतले आहे.
घडलेल्या घटनेमध्ये दत्ताराम लिंगायत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची महिंद्रा कंपनीची मॅक्स गाडी क्रमांक एमएच ०४ ई वाय १५६६ या गाडीमध्ये ६५ रिकामे सिलिंडर ठेवलेली होती. गाडी आणि हे सिलेंडर ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तुरळ गुरववाडी येथील लिंगायत यांच्या वडिलोपार्जित घराशेजारुन नेण्यात आले. ही गाडी आणि सिलेंडर हे त्या फायनान्स कंपनीच्या लोकांनी नेले असावे असे लिंगायत यांनी पोलिसांना माहिती दिली.
लिंगायत यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या नंतर पोलिसांनी शोध घेतला असता, त्या नंतर संगमेश्वर पोलिसांनी याचा शोध घेतला असता ती गाडी फायनान्स कंपनीच्या परिसरात असल्याचे दिसून आले. त्यामुळे चौकशीअंती संगमेश्वर पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आलेल्या तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार चंदू कांबळे, ,बाबुराव खोंदल, अनिल म्हैसकर, सचिन कामेरकर यांनी संबंधित ठिकाणी जावून हा मुद्देमाल जप्त केला.
त्यानंतर या दोघांना बुधवारी सकाळी अटक केली आहे. फायनान्स कंपनीचे काही हप्ते थकवल्यामुळे कंपनीने गाडी उचलली असल्याचं कारण समोर आले आहे.
फायनान्स कंपनीचे हप्ते थकवल्यामुळे कंपनीने गाडी उचलली, दोघांना अटक
घराशेजारी उभी असलेली बोलेरो मॅक्स गाडी आणि रिकामे सिलेंडर पळवून नेल्या प्रकरणी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल