31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...
HomeChiplunचिपळूणात फायनान्स कंपनीच्या जाळ्यात मोठमोठे अधिकारी, डॉक्टर

चिपळूणात फायनान्स कंपनीच्या जाळ्यात मोठमोठे अधिकारी, डॉक्टर

आमिषांला भुलून आणि हायफाय ऑफिस बघून अनेकांनी यामध्ये पैसे गुंतवले आहेत.

पोलीस अधिकारी कर्मचारी, डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारी याच्यासह मोठे राजकारणी यांनी मोठ्या प्रमाणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या फायनान्स कंपनीत पैसे गुंतवले असल्याचे समोर येत आहे. मात्र कंपनी विरोधात अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यानं अनेक पोलीस यामध्ये अडकले असल्याची चर्चा आता चिपळूणात सुरु असून या साऱ्याचा लवकरच भांडाफोड होण्याची शक्यता आहे. मोठा परतावा देण्याचे गोडस आमिषांला भुलून आणि हायफाय ऑफिस बघून अनेकांनी यामध्ये पैसे गुंतवले आहेत. यामध्ये सर्वसामान्य लोक आहेत मात्र त्याही पेक्षा उच्चशिक्षित लोकांचा मोठा भरणा असल्याने अनेक जण या फायनान्स कंपनीच्या गोडस आमिषाला बळी पडले असल्याचे पाहून मात्र आता सारेच हादरून गेले आहेत.

इकडे आड तिकडे विहीर – खरे तर अनेकजण धास्तवले आहेत अनेकांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे मात्र लेखी तक्रार कोणीही देत नाही. जर तक्रार दिली तर. सर्वच थांबेल असे कंपनीचे संचालक सांगत आहेत. नाही दिली तरी फक्त आश्वासन कंपनी देत आहे मात्र पैसे मिळत नाहीत. यामुळे गुंतवणूकदार इकडे आड तिकडे विहीर आशा कचाट्यात ‘सापडले आहेत.

पोलिसांची गुंतवणूक – या फायनान्स कंपनीचा मोह खास करून जिल्ह्यातील काही पोलिसांनाही पडला असल्याची चर्चा आहे. हे प्रमाण मोठे असल्याचे आणि यात काही मोठे अधिकारीही असल्याच्या चर्चा आहेत. मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणूक झाली असल्याची चर्चा असून काहींनी सुरवातीला चागला परतावा ही घेतला असल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टर आणि अन्य अधिकारी फायनान्स कंपनीने आपले जाळे उच्च स्तरीय आणि पैसे असणाऱ्या लोकांवर खास करून प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर अशा लोकांवर टाकले आहे मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारी यांनी लाखो रुपये गुंतवले असल्याचे आता सांगितले जात असून त्याची नावे ही नाक्यानाक्यात चर्चेत आहेत.

हायफाय ऑफिस – या. फायनान्स कंपनीचे ऑफिस हे हायफाय आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग आहे. सकाळी नास्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहापान आणि येणाऱ्यासाठी ही स्पेशल चहा अशा पंद्धतीने या ठिकाणी सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र सध्या फायनान्स कंपनीचे दिवाळे वाजल्या नंतर खरे रूप बाहेर आले आहे.

स्फोट घडणारं – आता खरे तर नेमके काय करावे या विचारात गुंतवणूकदार आहेत. संचालक याच्या हातापाया पडत आहेत. पैसे मागून गुंतवणूकदार अक्षरशः कंटाळले गेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात या फायनास कंपनी विरोधात मोठा स्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular