वातावरणातील बदलाचा फटका स्थानिक मासळी बाजाराला फटका बसला असून, स्थानिक बाजारात मासळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गारवा, थंडी, धुके आणि बदलते हवामान यामुळे समुद्रात मासेमारी कमी झाल्याने बाजारात मासळीची आवक घटली आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने दर चढे झाले आहेत. मच्छीमारांना प्रतिकूल हवामानामुळे समुद्रात जाणे कठीण होत असून, मासे खोल पाण्यात स्थलांतरित होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बांगडा, पापलेट, सुरमई, कोळंबी, रावस यांसारख्या लोकप्रिय मासळींचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. स्थानिक बाजारात बांगड्याचा दर ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो, पापलेट ८०० रुपयांच्या पुढे, तर कोळंबीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. ‘हवामान सुरळीत झाल्याशिवाय दर कमी होणार नाहीत,’ अशी प्रतिक्रिया मासेमारी करणाऱ्या बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नववर्ष आणिसणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागणीवाढलेली असतानाच वातावरण बदलामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे मासळीप्रेमींना महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. नवी मुंबईतील बहुतांश मच्छीमार हे मुंबई येथील भाऊचा धक्का व कुलाबा येथून ताजी मासळी खरेदी करतात. मात्र, त्या मासळीचीदेखील आवक कमी झाल्याने त्यांनादेखील भाव वाढीचा फटका बसला आहे. एकीकडे गारठा वाढला, तर दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा सगळा फटका मासळीच्या आवकवर त्यामुळे कमी मासळी मिळत असल्याने त्यांचे दरही वाढीव झाले आहेत. दिवाळे खाडीपासून ते ऐरोली खाडीपर्यंत मासेमारी केली जाते.
केली जात आहे. मांदेली आणि बोंबील या खाडीतून मासे, निवढी, बोईस, कोळंबी तसेच चिवणी मिळतात, पण गारठा वाढल्याने त्यांचीदेखील आवक खूपच कमी झाली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांची दिवसभराची मेहनत वाया जात असल्याची नाराजी व्यक्त हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे व परवडणारे मासेसुद्धा महाग झाले आहेत. त्यात वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. परिणामी, मासळीची आवक घटली असून, दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले असल्याचे मासेविक्रेत्या कविता मढवी म्हणाल्या. मासळीचा प्रकार व एक किलोचा दर-पापलेट ८०० ते १४००, सुरमई १२००, बोंबील २०० रुपयांना ६ नग, कोळंबी ६००, जिताडा १२००, रावस १५००, घोळ १३०० ते १६००.

