27.8 C
Ratnagiri
Tuesday, February 17, 2026

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...

चिपळुणात कुणाचा सभापती होणार? किंगमेकर शेखर निकमांच्या निर्णयाकडे लक्ष

चिपळुणात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने पंचायत...

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...
HomeRatnagiriएमआयडीसीतील मत्स्य उत्पादक कंपनीला दिड कोटींची गंडा

एमआयडीसीतील मत्स्य उत्पादक कंपनीला दिड कोटींची गंडा

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील ‘मे. जिलानी मरीन प्रॉडक्ट्स’ या नामांकित मत्स्य प्रक्रिया कंपनीची सुमारे १ कोटी ५८ लाख ७५ हजार २४० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कर्नाटक मधील मंगलोर येथील एका एक्सपोर्ट कंपनीच्या संचालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, मिरजोळे एमआयडीसी येथील जिलानी मरीन प्रॉडक्ट्स ही कंपनी मत्स्य उत्पादनांवर प्रक्रिया करून परदेशात निर्यात करते. या व्यवहारात मध्यस्थ म्हणून ‘किशोर’ कुमार आणि कंपनी (एक्सपोर्ट्स) प्रा. लि.’ (मंगलोर, कर्नाटक) काम पाहत होती. या कंपनीचे संचालक श्री. श्रीधरन किशोर कुमार यांनी ६ सप्टेंबर २०२५ ते १३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत इटलीतील ‘अर्दिमार एस. आर.एल.’ या कंपनीसाठी एकूण २४ टन मत्स्य उत्पादनांची मागणी केली होती,

आरोपी श्रीधरन यांनी जिलानी मरीन कंपनीला उत्पादनाचे पैसे वेळेत देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या सांगण्यावरून कंपनीने २४ टन माल इटलीला पाठवला. मात्र, या मालाचे पैसे जिलानी मरीनच्या बँक खात्यात जमा न करता, आरोपीने कंपनीची दिशाभूल केली. इटलीतील कंपनीला माल पोहोचवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी कंपनीचे मोठे नुकसान केले आणि विश्वासघात केला असे फिर्यादीमधे नमुद करण्यात आले आहे.

याप्रकरणी जिलानी मरीनचे अकाउंट मॅनेजर हैदरअली शब्बीर सनदी (वय ३५, रा. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी पोलिसांनी शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. आरोपी श्रीधरन किशोर कुमार याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या खालील कलम ान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कलम ३१६ (२): विश्वासघात कलम ३१८(३): फसवणूक आदी कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आंतरराष्ट्रीय व्यवहारात रत्नागिरीतील कंपनीला सव्वा कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मंगलोर कनेक्शनचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular