26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeRatnagiriमत्स्यविभाग 'अॅक्शन मोड'वर, दोन एलईडी मासेमारी नौका पकडल्या

मत्स्यविभाग ‘अॅक्शन मोड’वर, दोन एलईडी मासेमारी नौका पकडल्या

एलईडीविरोधात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. या विभागाने गस्ती दरम्यान बेकायदेशीर एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या २ नौका पकडल्या. दोन्ही नौका, एलईडी लाईट्स व जनरेटर यांची सुमारे प्रत्येकी १० लाख मिळून एकूण २० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. देशाला मत्स्योत्पादनात पुढे नेताना त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असावा, यासाठी बेकायदेशीर मासेमारी बंद करून मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी सोमवारच्या (ता. १३) पहिल्या दौऱ्यामध्ये त्यांच्या स्टाईलने मत्स्य विभागाला इशारा दिला होता. एलईडीविरोधात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. राणे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट रत्नागिरीत तत्काळ दिसून आला आणि सोमवारी रात्रीच २ एलईडी बोटींवर कारवाई करण्यात आली.

मत्स्य व्यवसाय विभागाची ‘रामभद्र’ गस्ती नौका गस्त घालत असताना ११ सागरी मैलाच्या दरम्यान एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या २ नौका आढळून आल्या. त्यामध्ये नौकामालक अर्शद अ. लतिफ पावसकर यांची नौका ‘साद माज’ (क्र. आयएनडी- एमएच – ४- एमएम- ३७३१) आणि नौकामालक लियाकत मस्तान यांची नौका ‘सुभान सफवान’ (क्र. आयएनडी- एमएच ४- एमएम- ९९८) यांच्यावर कारवाई केली. यात दोन्ही नौका, एलईडी लाईट्स व जनरेटर यांची सुमारे प्रत्येकी १० लाख अशी एकूण २० लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई – दोन्ही नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत प्रतिवेदन दाखल करण्याची कारवाई आज करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याने मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे अनधिकृत एलईडी लाईटचा वापर मासेमारीसाठी करू नये. अशाही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नौकांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular