23.8 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचे साम्राज्य

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचे साम्राज्य

सध्या तर कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आलेल्या जेलीफिशच्या झुंडीमुळे मच्छीमार हैराण झाले आहेत

रत्नागिरी गणपतीपुळे, जयगडपर्यंतच्या किनारी भागात जेलीफिशचा वावर वाढल्यामुळे गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जाळी फाटण्याच्या भितीने अनेकांनी मासेमारीला जाणे थांबवले आहे. पश्चिमेकडून पुर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यानी गणपतीपुळे, मिऱ्यासह जयगड किनारी भागात जेलीफिश मोठ्या प्रमाणात आहे. आणि विशेष करून हे जेलीफिश झुंडीने असल्याने जाळी फाटण्याची भिती अनेकांना सतावत आहे. काहींच्या जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.

गणपतीपुळे जयगडपर्यंतच्या किनारी भागात जेलीफिशचा वावर वाढल्यामुळे गिलनेटने मासेमारी करणार्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र खोल समुद्रात जाणार्‍या मोठ्या नौकांना, पर्ससीननेट वापरणार्या मच्छिमाऱ्यांची मात्र चांगले मासे मिळत असल्याने चंगळच झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका नौकेला अंदाजे ७५ हजार ते १ लाख १० हजाराची उष्टी बांगडी मिळत आहेत.

अनेकांच्या बोटी बंदरातच उभ्या आहेत. डिझेल दर वाढीमुळे गिलनेटवाल्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सध्या डिझेल ११० रु. लिटर आहे. गिलनेटवाले जास्तीत जास्त दहा वावात जावून मासेमारी करतात. जेलीफिशमुळे मिर्‍यासह आजुबाजूच्या छोट्या बंदरांमधील मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळले आहे. त्यांना एका फेरीला डिझेल ३५ ते ४० लिटर डिझेल लागते. इंधनासह अन्य मिळून २० हजार रुपये दिवसाला खर्च येतो पण मिळणारे दिवसाचे उत्पन्न मात्र दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी अशी परिस्थिती सध्या ओढावली आहे.

सध्या तर कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आलेल्या जेलीफिशच्या झुंडीमुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. एकतर वाढलेल्या इंधन दरामुळे मासेमारी करण्यात अडचणी आणि त्यात आत्ता जेलीफिश मच्छीमारांच्या जाळ्या तोडून टाकतात त्यामुळे होणारे मच्छीमाऱ्यांचे नुकसान हे न पेलणारे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular