25.8 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriरत्नागिरीत पोषक वातावरणामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी

रत्नागिरीत पोषक वातावरणामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी

मच्छीमारांना बांगडा, गेजर, सौंदाळा, सुरमई, झिंगा, म्हाकुळ असा रिपोर्ट लागत आहे.

वातावरणातील विपरित परिणामुळे यंदाच्या मासळी हंगामातील सुमारे २० ते २२ दिवस वाया गेले. कालपासून वातावरण पोषक असल्याने ९५ टक्के नौका मासेमारीसाठी दर्यावर स्वार झाल्या आहेत. बांगडा, गेजर, सौंदाळा, सुरमई असा बंपर रिपोर्ट मच्छीमारांना मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. नारळी पौर्णिमेनंतर जिल्ह्यात मासेमारी हंगाम सुरू झाला; परंतु पावसाळी वातावरणामुळे तो पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. अनेक मच्छीमारांनी जीवावर उदार होऊन मासेमारी हंगामाला सुरवात केली; परंतु बदलत्या हवामानामुळे मासेमारीला वारंवार ब्रेक लागत होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पर्ससीन मासेमारीचा हंगाम सुरू झाला; परंतु परतीचा पाऊस बसल्याने गेले २२ दिवस मासेमारी ठप्प होती.

सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस होत असल्याने मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. गेले तीन दिवस पावसाने उघडीप दाखवली आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पोषक वातावरण असल्याने बंदरात नांगरून ठेवलेल्या एकूण ६० टक्के मच्छीमारी नौका कालपासून पुन्हा समुद्रावर स्वार झाल्या आहेत. ९५ टक्के मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेल्याचे मच्छीमारांनी सांगितले. खऱ्या अर्थाने आता हंगाम सुरू झाला असून, रिपोर्टही चांगला मिळत आहे. अनेक मच्छीमारांना बांगडा, गेजर, सौंदाळा, सुरमई, झिंगा, म्हाकुळ असा रिपोर्ट लागत आहे. आता त्यामुळे मच्छीमारांमध्ये चांगलाच उत्साह आहे.

RELATED ARTICLES

Most Popular