22.8 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriजोरदार वाऱ्यामुळे मासेमारीला अटकाव

जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीला अटकाव

मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका समुद्रात नेणे धोकादायक असते.

समुद्रात झालेली वादळे, हवामानात झालेला बदल यामुळे आधीच मच्छीमारी व्यवसाय अडचणीत आला असताना, आता समुद्रात सुटलेल्या मतलई वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान होत आहे. लहरी हवामानामुळे मत्स्यदुष्काळाचे संकट मासेमारी उद्योगासमोर उभे ठाकले असून, मासेमारी करणारे व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. यावर्षी ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला अद्याप सूर सापडलेला नाही. मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून समुद्रात झालेल्या वादळांचा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर झाला आहे.

बदलत्या हवामानामुळे मासे मिळण्याचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी, हजारो रुपयांचे इंधन खर्च करून बोट समुद्रात नेल्यावर मासळी हाताशी लागत नसल्याने मच्छीमारांच्या पदरी निराशा येत आहे. आता मतलई वाऱ्यांमुळे मासेमारीवर परिणाम होत आहे. मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका समुद्रात नेणे धोकादायक असते. या वाऱ्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकण्यात अनेक अडथळे येतात. त्यामुळे अनेक नौका किनाऱ्यावर आहेत. कमी मासळीमुळे किंमतीत वाढ होणार असल्याने त्याचा फटका खवय्यांना बसणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular