27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriरत्नागिरी काजळी नदीच्या पुराचा तोणदे येथील सोमेश्वर मंदिराला वेढा

रत्नागिरी काजळी नदीच्या पुराचा तोणदे येथील सोमेश्वर मंदिराला वेढा

मुसळधार कोसळणारा पाउस आणि भरतीची वेळ यामुळे शनिवारी तोणदे गावाला मोठा फटका बसला.

मुसळधार पावसाचा फटका तोणदेसह सोमेश्वर गावाला बसला असून तोणदे येथील सोमेश्वर मंदिर रविवारी पाण्याखाली आले होते. येथील भातशेती देखील पाण्याखाली गेली. सोमेश्वर येथील एक गार्डन पूर्ण खाडीच्या पाण्याने भरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाउस कोसळत आहे. याचा फटका नुकताच उत्तर रत्नागिरीला बसला असून आता दक्षिण भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणत पाउस कोसळल्याने कोकणातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मुसळधार कोसळणारा पाउस आणि भरतीची वेळ यामुळे शनिवारी तोणदे गावाला मोठा फटका बसला.

शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले असून, तोणदे गावातील श्री सांव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. मंदिराच्या सभोवताली पुराचे पाणी साचल्याने मंदिरात जाण्याचा मार्गही बंद झाला. पहाटेपासून खाडीच्या पात्रात पाणी वाढू लागले. बघता बघता पाण्याचा प्रवाह अधिकच वाढला आणि येथील सोमेश्वर मंदिर पाण्याखाली गेले. मंदिर पाण्याखाली गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

येथील भातशेती देखील पाण्याखाली आली आहे. दुसरीकडे सोमेश्वर परिसरात देखील पाण्याच्या पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली. येथील एक बगिच्या पूर्ण पाण्याखाली गेला. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने येथील धोका टळला. मात्र सांयकाळी उशिरापर्यंत सोमेश्वर परिसरात पाणी भरण्याची भीती कायम होती. प्रशासनाने तोणदे व सोमेश्वर भागावर विशेष लक्ष दिले असून खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular