27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeKhedखेडमध्ये पूर ओसरला नुकसानीचा आढावा सुरु

खेडमध्ये पूर ओसरला नुकसानीचा आढावा सुरु

अनेकठिकाणी झाडे कोसळल्याने महावितरणच्या तारा तुटल्या आहेत.

खेडमधील पूर शुक्रवारी पहाटे ओसरला आणि रात्रभर टेन्शनमध्ये असलेल्या नागरिकांनी विशेषतः व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आता या पुरामध्ये किती नुकसान झाले? याचा आढावा घेण्याचे काम शासकीय यंत्रणेने सुरू केले आहे. जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास खेडच्या मच्छिमार्केटमध्ये घुसले. हे पाणी इतक्या वेगात घुसले की अवघ्या १० ते १५ मिनिटांत मशिद, गांधी चौक, तिनबत्तीनाका परिसर काबिज करत अख्ख्या खेड बाजारपेठेमध्ये या पाण्याने विळखा घातला. पुराची शक्यता असल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांचे साहित्य आधीच सुरक्षितस्थळी हलविले होते.

तरीही पाऊस थांबत नसल्याने पाणी आणि बाजारपेठेत पाणी असल्याने बहुसंख्य व्यावसायिकांनी रात्र जागून काढली. पहाटेच्या सुमारास पूर ओसरला. दरम्यान, गेल्या ३ दिवसांच्या धो-धो पावसामुळे तालुक्यात देखील अनेक ठिकाणी पडझड झाली असून घरे-गोठे, शाळा यांचे नुकसान झाले आहे. अनेकठिकाणी झाडे कोसळल्याने महावितरणच्या तारा तुटल्या आहेत. त्यामुळे काही गावांत वीज सुरू नाही. या सर्व नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावेत, असे आदेश आ. योगेश कदम यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular