26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeKokanराज्यात थंडीचा कहर अजून काही दिवस कायम

राज्यात थंडीचा कहर अजून काही दिवस कायम

ग्रामीण भाग जे विशेष करून समुद्र नदी किनारी आहेत त्या भागात अतितीव्र थंडीच्या लाटेमुळे अधिक गारठा जाणवणार आहे

भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने आगामी तीन दिवस सातत्य राहण्याचे संकेत दिले आहेत.  राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे.

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान तापमान १० अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट झालेली पहायला मिळाली आहे. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये काही ठिकाणी कमाल तापमान २० अंशाखाली नोंदवलं गेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट झालेली पाहायला मिळाली आहे. पुणे मंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये तापमानामध्ये विलक्षण बदल घडत असून, तापमान १० ते १५ अंशावर आलेलं सुद्धा मागील काही दिवसात दिसून आले आहे.

कोकण किनारपट्टी बाजूला सर्वच जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. विशेषत: रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरणार असल्याचे वृत्त आहे. उत्तर-पश्चिम भागावर धुक्यासह कडाक्याची थंडीची लाट येणार आहे. राज्यातील बदलत्या वातावरणाचा परिणाम कोकणासह किनारी भागात जास्त जाणवणार आहे.

ग्रामीण भाग जे विशेष करून समुद्र नदी किनारी आहेत त्या भागात अतितीव्र थंडीच्या लाटेमुळे अधिक गारठा जाणवणार आहे. मंगळवारपासून किमान तापमानाची सुरू झालेली घट गुरूवारी देखील कायम होती. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात धुक आणि गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. गुरूवारी रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी कमाल २३ तर किमान १७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular