26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeIndiaजगभरातील सोशल व्यासपीठांचे सर्व्हर तब्बल सात तास डाऊन

जगभरातील सोशल व्यासपीठांचे सर्व्हर तब्बल सात तास डाऊन

खुद्द फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गने सुद्धा बंद पडलेल्या व्यासपिठामुळे, अवघ्या काही तासामध्येच जवळपास ४५ हजार ५५० कोटी रुपये गमावले आहेत.

हल्ली प्रत्यक्ष भेटणे आणि बोलणे शक्य होत नसल्याने, सोशल मिडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातूनच भेट घेणे शक्य होते. कल रात्री अचानक ९.३७ च्या दरम्यान सोशल मिडीयावरील तांत्रिक बिघाड घडून आला . त्यामुळे व्हॉट्सअॅप,  फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा कार्य होण्यास अडथळे येत होते.

अखेर सात तासांनी हा तांत्रिक बिघाड दूर झाला आहे. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तांत्रिक बिघाड दूर होऊन व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेकानी बऱ्याच वेळा आपापले मोबाईल रीस्टार्ट केले असतील त्याचा नेम नाही. शेवटी सोशल मीडियाची सर्वाना खूपच सवय झालेली असते.

अनेक कंपन्या आणि संस्थां आपल्या उत्पादनांची जाहिरात आणि प्रसार करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारख्या व्यासपीठांचा वापर करतात. अनेक जण आपआपले वैयक्तिक व्यवसाय सुद्धा प्रसिद्धी साठी फेसबुकचा वापर करतात. परंतु, कल सात तास ही दोन्ही व्यासपीठं बंद पडल्याने अनेकांना त्याचा फटका बसला आहे.

खुद्द फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गने सुद्धा बंद पडलेल्या व्यासपिठामुळे, अवघ्या काही तासामध्येच जवळपास ४५ हजार ५५० कोटी रुपये गमावले आहेत. या तोट्याचा त्याच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानावर सुद्धा परिणाम झालेला दिसून आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती गमावल्याने त्याच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानामध्येही घसरण झाली असून तो आता बिल गेट्स नंतरच्या पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

काल फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाचे जगभरातील सर्व्हर तब्बल सात तासांसाठी डाऊन झाले असल्याने  त्याचा फटका थेट फेसबुकला बसला असून फेसबुकचे शेअर्सही ४.९  टक्क्यांनी देखील घसरले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular