27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeLifestyleनिरोगी आयुष्यासाठी, झोप किती महत्वाची !

निरोगी आयुष्यासाठी, झोप किती महत्वाची !

निरोगी आयुष्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. आपला कम्फर्ट झोन बघून काही जण त्याला आरामदायी आयुष्य समजतात. सकाळी लवकर उठणे, सूर्यप्रकाशाची किरणे अंगावर घेणे, व्यायाम, घरकाम, नाश्ता, ऑफिस, दुपारचा सकस आहार, चहा, संध्याकाळी थोडा व्यायाम अथवा मोकळ्या हवेत चालणे, रात्री आठ वाजेपर्यंत जेवण आणि त्यानंतर दोन तासाने रात्रीची शांत झोप असा काहीसा बऱ्याच जणांचा निरोगी आयुष्याचा फंडा असतो.

पण खरचं असे आयुष्य आपण रोज जगतो का ! याबाबत प्रत्येकाने सखोल विचार करणे गरजेचे आहे. तब्ब्येत निरोगी राहण्यासाठी दररोज ८ ते ९ तास शांत झोप येणे गरजेचे असते. परंतु काही जणांना मानसिक तणाव, नैराश्य, निद्रानाश इत्यादींमुळे शांत झोप येण्यास खूप अडचणी येतात. पण हीच न लागणारी झोप जीवनात अनेक समस्या निर्माण करते. व्यवस्थित झोपे न लागल्यामुळे मूड एकत्र निराशाजनक असतो नाहीतर चिडका तरी. कोणत्याही शुल्लक गोष्टीचा तुम्हाला सतत आणि पटकन राग येतो. झोपेच्या अभावामुळे चिडचिड होणं आणि राग येणं हे तुमच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यासाठी तसंच इतरांसाठी हानिकारक ठरू शकतं. दैनंदिन कामावरही याचा परिणाम होऊ शकतो.

जर तणावामुळे झोप लागत नसेल तर त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जीवनशैलीमध्ये काही प्रमाणात बदल करणे गरजेचे आहे. जसं मेडीटेशन करणे किंवा झोपेच्या सवयी सुधारणे. कोणतेही केलेले नियोजन हे प्रामाणिकपणे अवलंबणे आवश्यक असते. जेणेकरून दररोज ८ ते ९ तास गरजेची झोप तुम्हाला मिळेल. त्यामध्ये सुद्धा एखादा चीटिंग डे असला तरी हरकत नाही, पण तशी शरीराला सवय होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular