22.7 C
Ratnagiri
Wednesday, December 3, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeDapoliदागिन्यांच्या लालसेपोटी वनौशीतील ३ वृद्ध महिलांचा खून, पोलिसांचा कयास

दागिन्यांच्या लालसेपोटी वनौशीतील ३ वृद्ध महिलांचा खून, पोलिसांचा कयास

चोरांनी त्यांच्या अंगावरील दागिने चोरल्यानंतर डोक्यावर जोरदार प्रहार करून त्यांना ठार मारले.

दापोली तालुक्यातील वनौशी खोतवाडी येथे एकाच घरातील ३ वृद्ध महिलांचा जखमी अवस्थेत जळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. अज्ञाताने घडवलेल्या या घटनेने दापोली तालुका हादरून गेला आहे. वृद्धांच्या या संशयित मृत्यूने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. केवळ पैसे आणि दागिन्यांसाठी खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक अहवालात समोर आले आहे.

सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे , इंदूबाई पाटणे या महिलांचा दापोलीमध्ये राहत्या घरी आश्चर्यकारक मृत्यू झाला. मृत्यूनंतर या महिलांच्या अंगावरील १ लाख ६२  हजार १५० रुपयांचे दागिने चोरीस गेले. या महिला ज्या घरात मृतावस्थेत आढळल्या असून, त्यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा होता. चोरांनी त्यांच्या अंगावरील दागिने चोरल्यानंतर डोक्यावर जोरदार प्रहार करून त्यांना ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या तिन्ही महिलांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असा पोलिसांचा कयास आहे. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी काशीद करत आहेत.

दापोलीतील तालुक्यातील वणौशी खोतवाडी येथे एकाच घरात तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाला. या मृत्यूमागे घातपात असल्याचा निष्कर्ष पोलिस तपासात उघड झाला आहे. या घटनेचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, उपविभागीय पोलिस अधिकारी, डॉगस्कॉड आणि मोठा पोलिस फौजफाटा वणौशी गावामध्ये थांबून तपास करत आहे.

अचानक घडलेल्या या घटनेनंतर तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या दिवशीच ही घटना घडली असून, घटना घडून ४ दिवस झाले तरी अद्याप आरोपी पकडण्यात आलेला नाही. दागिन्यांच्या लालसेपोटीच या तीन वृद्ध महिलांना मारून जाळले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular