27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeEntertainmentदीपवीर झाले अलिबागमध्ये स्पॉट!

दीपवीर झाले अलिबागमध्ये स्पॉट!

रामलीलाच्या चित्रीकरणाच्या सेटवरच रणवीर आणि दीपिकामध्ये जवळीक निर्माण झाली होती.

बॉलिवूड फेमस कपल दिपवीर अलिबागमध्ये अचानक दिसून आल्याने चाहत्यांची गर्दी झाली आहे. दीपिका  आणि रणवीरची जोडी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांना बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक समजले जाते. २०१९ मध्ये लग्न झाल्यापासून हे दोघे नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. रणवीर आणि दीपिकाने एकमेकांसोबत बराच वेळ डेट केल्यानंतर पुढे जाऊन लग्नाचा निर्णय घेतला. रणवीर तर अनेक वेळा माध्यमांच्या समोरच दीपिकावरील प्रेम व्यक्त करायला मागेपुढे बघत नाही.

हिंदी सिनेसृष्टीतील या कपलने म्हणजेच दिपवीरने नुकतीच एका महागडी जागेची खरेदी केली असून,  रणवीर आणि दीपिकाने मुंबई पासून काहीच तासांच्या अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये तब्बल ९० गुंठे जागेची खरेदी केली आहे. अलिबागमधील मापगाव या भागामध्ये त्यांनी ही जागा २२ कोटी रुपयांच्या आसपास खरेदी केली आहे. आणि यासाठी दिपवीर या जागेच्या रजिस्ट्रेशनसाठी नुकतीच अलिबागच्या रजिस्ट्रार कार्यालयामध्ये स्पॉट झाली आहेत.

दीपिकाला फुलझाडांची आवड असल्याने दीपवीरने खरेदी केलेल्या अलिबागमधील या जागेमध्ये दोन आलिशान बंगले असून, नारळ, सुपारीचे उत्पन्न देणाऱ्या तयार बागा आहेत. रणवीर आणि दीपिका या जागेच्या नोंदणीसाठी नुकतीच अलिबागमध्ये आली होती. त्यावेळी आपल्या लाडक्या कपलची एक अदा टिपण्यासाठी अनेक चाहते गोळा झाले होते.

रणवीर आणि दीपिकाने हे जरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असले आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात सुद्धा तिथूनच झाली आहे. त्या दोघांनी एकत्रितपणे रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रामलीलाच्या चित्रीकरणाच्या सेटवरच रणवीर आणि दीपिकामध्ये जवळीक निर्माण झाली होती. दोघांनी रामलीलाच्या सेटवरच एकमेकांना डेटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटात दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

RELATED ARTICLES

Most Popular