28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...
HomeIndiaओमायक्रॉनपासून वाचण्यासाठी डबल मास्कचा वापर करावा

ओमायक्रॉनपासून वाचण्यासाठी डबल मास्कचा वापर करावा

वैज्ञानिकांनी या व्हायरस आणि त्याबाबत घेण्याच्या काळजी बद्दल मोठा खुलासा केला आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुपात अनेक देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे.  वैज्ञानिकांनी या व्हायरस आणि त्याबाबत घेण्याच्या काळजी बद्दल मोठा खुलासा केला आहे. जर ओमायक्रॉनपासून जर आपल्याला वाचायचे असेल तर, आपल्याला या काळात दोन मास्क वापरावे लागतील असा खुलासा अनेक वैज्ञानिकांनी केला आहे.

कोरोनाची लस न घेतलेले, डॉक्टर्स, पोलीस आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी देखील डबल मास्क परिधान करावे. सिंगल मास्क लावल्याने तोंडाच्या दोन्ही बाजूंनी काही प्रमाणात जागा मोकळी राहते, त्यामुळे संक्रमणचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी,  निर्बंधित विभाग, रुग्णालय तसेच गर्दीच्या ठिकाणी दोन मास्क घालणे आवश्यकच आहे.

त्याचप्रमाणे कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी दोन मास्क घालणे बंधनकारक असल्याचे देखील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. दोन मास्क लावल्याने आपण ९० टक्के कोरोनापासून सुरक्षित राहू असे तज्ञांचे म्हणणे आहे.

दोन मास्क वापरताना ते कशाप्रकारचे असावेत! त्यावर अमेरिकी हेल्थ एजेंसी सेंटर्स फॉर डिसज कंट्रोल अॅण्ड प्रीवेंशननुसार, सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क वापरणे सोयिस्कर ठरणार आहे. कारण कपड्याचे मास्क घातल्यानंतर सर्जिकल मास्क चौहूबाजूंनी झाकला जातो. जर आपण N95 मास्क वापरत असाल तर आपल्याला इतर कोणत्याही प्रकारचे दोन मास्क घालण्याची गरज भासणार नाही. कारण हा एकटा मास्क कोरोनाशी सामना करण्यास सक्षम आहे.

मास्क वापरताना आणि फेकताना सुद्धा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कला हात लावण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरचे वापर करा. मास्कची साईज अशी असू द्या कि, तुमचे नाक, तोंड पुर्णपणे झाकले जाईल. एकदा मास्क घातल्यानंतर त्याला सारखा हात लावत राहू नये. तर हात लावत असाल तर तात्काळ हात स्वच्छ करावे. सिंगल मास्क घालत असाल, तर त्याला एकदाच घाला. जर दुसरा मास्क घालत असाल तर त्याला धुवून परत वापरा. त्याच प्रमाणे सिंगल मास्क फेकताना, नेहमी त्याचे छोटे-छोटे तुकडे करुन फेकावे. या छोट्या-छोट्या तुकड्यांना ७२ तास आधी पेपर बॅगमध्ये ठेवा. त्यामुळे मास्कवाटे संक्रमणाचा धोका कमी होतो.

RELATED ARTICLES

Most Popular