26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriआजारपणाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

ग्रामस्थांनी दारे खिडक्या वाजवून पण प्रतिसाद न आल्याने दार तोडल्यावर समोरील दृष्य पाहून हादरले.

गुहागर तालुक्यात वेलदूर खारवीवाडीत २३ वर्षीय युवतीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये आजारपणाला कंटाळून आपण ही आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला असून दुपारनंतर खूप वेळ दारे-खिडक्या न उघडल्याने शेजारी असलेल्या महिलेने हाक मारली यावेळी प्रतीक्षाने बराच वेळ हाक दिली नाही म्हणून त्यांनी अन्य ग्रामस्थांना हा विषय सांगितला. ग्रामस्थांनी दारे खिडक्या वाजवून पण प्रतिसाद न आल्याने दार तोडल्यावर समोरील दृष्य पाहून हादरले. प्रतिक्षा कुशा तांडेल वय २३ असे या आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

ही तरुणी वेलदुर येथे आपल्या मामा शेजारी भाड्याने घेतलेल्या खोलीत वास्तव्यास होती. त्याच ठिकाणी तीने लोखंडी बारला साडीचा फास तयार करुन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी उशिरा हा सगळा दुर्देवी प्रकार समोर आला. तिच्या पश्चात आई व भाऊ असे कुटुंब आहे. या संदर्भात पोलीसांनी अधिक चौकशी व तपासणी केली तेव्हा ५ दिवसांपूर्वी प्रतिक्षा डॉक्टरांकडे जावून आल्याचे कळले. आणि तिने नऊ हजार रुपयांची औषधे देखील खरेदी केली.

प्रतिक्षा कुशा तांडेल अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून नोकरी करत होती. वडिल कुशा तांडेल हे मुळचे साखरी आगरचे. वडिलांच्या निधनानंतर प्रतिक्षा आणि तिच्या भावाचे संगोपन आणि शिक्षण आईने घरकाम करुन केले. प्रतिक्षा पदवीधर तर प्रतिक्षाच्या भावाने सिव्हील इंजिनिअरींग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणानंतर प्रतिक्षा डाटा ऑपरेटर म्हणून ग्रामपंचायतीमध्ये नोकरी करु लागली. तर भाऊ खेड येथे नोकरी करत आहे. ग्रामस्थांनी याची खबर गुहागर पोलिसांना दिली. अखेर शवविच्छेदनानंतर प्रतिक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साखरी आगर येथे सोमवारी प्रतिक्षावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्या दुर्देवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक होते आहे.

RELATED ARTICLES

Most Popular