28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीचे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परूळेकर यांचे निधन

रत्नागिरीचे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परूळेकर यांचे निधन

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून ते २ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि भूतपूर्व खासदार चंद्रकांत काशिनाथ तथा बापूसाहेब परूळेकर यांचे गुरूवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी सकाळी ८.५० वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते. बापूसाहेब परूळेकर यांच्या निधनाने एक ख्यातनाम विधीतज्ज्ञ आणि लोकसेवक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सान्या राज्यात ते नामवंत कायदेतज्ज्ञ म्हणून परिचित होते. जनसंघ आणि त्यानंतर स्थापन झालेल्या जनता पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून ते २ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. रत्नागिरीतील जनसंघाच्या अनेक कार्यकत्यांची जडणघडण त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

खासदार म्हणून त्यांनी आपली छाप लोकसभेत उम टवली होती. १९७७ ला जनसंघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर १९८० मध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून गेले. रत्नागिरीतील जनसामान्यांचे अनेक प्रश्न त्यांनी या माध्यमातून धसास लावण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी उभारलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्येदेखील बापूसाहेब परुळेकर सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान त्यांना अटक झाली होती. आणिबाणीच्या काळातदेखील मिसा कायद्याखाली ते १६ महिने कारावासात होते. १९६० १९७० या दशकात रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. आपल्या संघटन कौशल्याच्या आधारे त्यांनी जिल्ह्यात पक्ष मजबुतीचे काम केले.

अटलजी, राजीव गांधींशी स्नेह – खासदार म्हणून काम करताना स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांची मैत्री झाली होती. १९७० साली अटलजी जेव्हा रत्नागिरीत आले तेव्हा ते बापूसाहेबांच्या घरी भोजनासाठी गेले होते. लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते राजीव गांधी यांच्याशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. अनेक कायदेशीर बाबींमध्ये राजीव गांधी बापूसाहेबांचा सल्ला घेत असत अशी आठवण आजही अनेक बुजुर्ग सांगतात.

लोकसभेमध्ये विधेयकेही मांडली – कायद्यातील तरतुदीबाबतच त्यांनी विविध विषयावर लोकसभेमध्ये विधेयकेही मांडली. लोकसभेतील त्यांच्या कालावधीमधील काम काजाच्या पुस्तकांचे जतनही त्यांनी व्यवस्थितपणे करून ठेवले होते. एखादी राजकीय घटना घडली तर बापूसाहेब त्या बाबतच्या लोकसभेम धील चर्चेची माहिती त्या पुस्तकांमधून शोधून काढून विवेचन करत असत.

वकिलीतील आदर्श – रत्नागिरीमधील ज्येष्ठ आणि खऱ्या अर्थाने श्रेष्ठ अशी त्यांची ओळख होती. वकिलीच्या क्षेत्रामध्ये. त्यांचे योगदान मोठे होते. नवीन पिढीसमोर वकिलीचा व्यवसाय कसा करावा याचा आदर्श त्यांनी ठेवला. सन १९५१ मध्ये त्यांच्या काकांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू केली. ज्येष्ठांचा मान, त्यांचा आदर, सर्वांशी नम्र वागणूक अशी त्यांची ओळख होती. न्यायिक अधिकाऱ्यांनाही ते मान देत. कोर्टासमोर युक्तिवाद करताना किवा पुरावा सादर करताना काही वाद निर्माण झाले तरी त्यांची भाषा मृदू असे. अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसनंतरही ते अजातशत्रू राहिले. कायदा कितीही पाठ असला तरी त्याचे वारंवार वाचन पाहिजेच, असे ते सांगत, कायदेविषयक अनेक संस्थांचे नार्गदर्शक म्हणून बापूसाहेबांनी काम पाहिले.

रत्नागिरीत हळहळ – गुरूवारी दुपारी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक विधीज्ञ, राजकीय नेतेमंडळी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र प्रसिध्द वकील अॅड. प्रदीप तथा बाबा परूळेकर, उद्योजक पंकज परूळेकर, सुना, नातवंडे, पंतवंडे असा विशाल परिवार आहे. बापूसाहेबांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular