शिवसेना (शिंदे गट) चे नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. त्यांचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी ब्रिगेडीअर सावंत म्हणाले,मी दहशतवादाला साथ देणाऱ्या विरोधात कायमच उभा राहीलो आहे. उध्दव ठाकरे यांनी सर्वांना बरोबर घेऊन नवीन महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी दिशा दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार परशुराम उपरकर,शिवसेना उपनेते शरद कोळी, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, माजी सभापती जयप्रकाश चमणकर,रेवती राणे, डॉ जयेंद्र परुळेकर, विभावरी सुकी आदी उपस्थित होते.
ब्रिगेडियर सावंत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी दिशा दिली आहे. पक्ष मोठा होईल. दहशत गुंडागर्दी नारायण राणे यांनी माजवली तेव्हापासून माझा त्यांना विरोध आहे त्यांच्या सोबत असणाऱ्यांच्या विरोधात मी कायमच राहिलो आहे. कोकणात नवीन शक्ती निर्माण करून उद्धव ठाकरे यांनी दिशा देण्याचे काम केले आहे. फसविणाऱ्या गद्दारांना धडा शिकवणे ही आजची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण राजकोट येथील पुतळा उभारू नये म्हणून मी नौसेनेला सांगितले होते. ती जमीन मच्छीमारांची आहे तरी तो पुतळा बांधला आणि कोसळला याची या लोकांना लाज वाटत नाही. उद्धव ठाकरे यांनी कायमच लोकांना सन्मान दिला आहे ते सन्मानपूर्वक नवीन पुतळा उभारतील असा मला विश्वास वाटतो.