28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

मोकाट गुरांच्या समस्येकडे यंत्रणांची डोळेझाक…

रत्नागिरी शहरामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढतच चालला...

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...
HomeDapoliहर्णे बंदरातील संतप्त मच्छीमार्यांचा पेटवून घेण्याचा इशारा

हर्णे बंदरातील संतप्त मच्छीमार्यांचा पेटवून घेण्याचा इशारा

मागील दोन ते तीन महिन्यांपासून तर या फास्टर नौकांकडून अशाच प्रकारची मासळीची लूट सुरू असून या बंदरात मासळीची आवकच कमी झाली आहे.

परप्रांतातून मासेमारीसाठी येणाऱ्या नौका आणि त्यांची वाढत चाललेली आडमुठेगिरी त्यामुळे स्थानिक मच्छीमार त्रस्त झाले आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ येथून एवढ्या लांब मच्छीमारीसाठी नौका येतात. त्यांचे प्रमाण आता अतीच वाढत चालले असल्याने त्याचप्रमाणे त्या नौका वाहकांची सुरु असलेली अरेरावी यामुळे हर्णे बंदरातील स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे.

हर्णै बंदरातील पारंपारिक मच्छिमार फास्टर नौकांचा समुद्रामध्ये पुन्हा सुरु झालेल्या धुडगूसामुळे संतापले असून, शासन मात्र त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हे मच्छिमार करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या या मच्छिमार्यानी “नौकांचा धुडगूस जर थांबला नाही, तर तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेऊ” असा सूचक इशाराच जिल्हा शासनाला दिला आहे.

दाभोळ, हर्णै, बुरोंडी, आडे, उटंबर, अडखळ, केळशी,पाजपंढरी , कोळथरे, पंचनदी, ओणनवले आदी गावातील नौका हर्णै बंदरात मासेमारी करण्यासाठी येतात. या व्यवसायातील सुमारे १ हजार नौकांमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दहा हजारांवर रोजगार मिळतो. गेल्या चार-पाच वर्षापासून समुद्रात आधुनिक साहित्याच्या आधारे परप्रांतीय फास्टर नौका लहान मोठी सर्वच मासळी फार कमी अवधीत पकडून घेऊन जातात. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांना म्हणावे तसे, मासे मिळत नाहीत. मिळेल ते काहीतरी रोजच्या साठीचे मासे घेऊनच माघारी परतावे लागत आहे.

मागील दोन ते तीन महिन्यांपासून तर या फास्टर नौकांकडून अशाच प्रकारची मासळीची लूट सुरू असून या बंदरात मासळीची आवकच कमी झाली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे चिंन्ह दिसत असून, यावेळी मात्र गप्प न बसता होणार्या अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे सर्व माच्चीमार्यानी मिळून ठरवले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular