किनारपट्टीत साडेचार मी. उंच लाटा उसळणार!

371
With the arrival of Monsoon, gale force winds and waves in the Arabian Sea

काही दिवसातच मान्सूनचे आगमन होईल, मान्सूनच्या आगमनाबरोबरच वादळी वारे आणि अरबी समुद्रात उसळणाऱ्या लाटा उंचच उंच कोकण किनारपट्टीवर येऊन धडकणार आहेत. यातून बचाव करण्यासाठी हवामान विभागाने उधाणाचे वेळापत्रक जाहिर केले असून यंदाच्या मान्सून हंगामात साडेचार मीटर उंचीच्या लाटा २५ दिवस रत्नागिरीसह कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहेत. या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊसही कोसळतो. वाळूच्या किनाऱ्यावर लाटा धडकत असतात. त्यामुळे किनाऱ्याची धूप होऊ नये म्हणून आधिच तयारी करावी लागते. उधाणाचा तडाख्याने शेताची बांधबंदिस्ती नादुरुस्तीच्या घटना घडत असतात.

मच्छिमारांची लगबग वाढली – मान्सूनचे आगमन होण्यापुर्वी १. जून पासून पुढील दोन महिने मासेम ारी बंद राहणार आहे. मासेमारी बंद होण्यास अगदी काही दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे जितकी मासेमारी करुन जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, याकडे मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले आहे. मान्सून सुरु होताच उधाणाच तडाखा लागू नये म्हणून समुद्रातल्या नौका सुरक्षित स्थळी आणून ठेवाव्या लागणार आहेत. नौका शाकारुन ठेवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करण्याची लगबग सुरु झाली आहे.

मान्सूनमधील उधाणाचे वेळापत्रक – ४ जून १२.१६ वा. ४.६२ मीटर, ५ जून १३.०१ वा. ४.६९ मीटर, ६ जून १३.४७ वा. ४.६९ मीटर, ७ जून १४.३५ वा. ४.६४ मीटर, ८ जून १५.२५ वा. ४.५१ म मीटर, ३ जुलै १२.२ वा. ४.७२ मीटर, ४ जुलै १२.४९ वा. ४.७२ मीटर, ५ जुलै १२.३६ वा. ४.७८ मीटर, ६ जुलै १२.२३ वा. ४.७७ मीटर, ७ २ ऑगस्ट १२.३० वा. ४.७६ म मीटर, ५ ऑगस्ट ४.३८ वा. ४.८७ जुलै १२.१० वा. ४.६९ मीटर, ८ जुलै १२.५५ वा. ४.५२ मीटर, १ ऑगस्ट ११.४६ वा. ४.५८ मीटर, ३ ऑगस्ट १३.१४ वा. ४.८७ मीटर, ४ ऑगस्ट १३.५६ वा. ४.८७ मीटर, ६ ऑगस्ट १५.२० वा. ४.५१ मीटर, ३० ऑगस्ट ११.२६ वा. ४.५९ मीटर, ३१ ऑगस्ट १२.०६ वा. ४.८० मीटर, १ सप्टेंबर १२.४४ वा. ४.८८ मीटर, २ सप्टेंबर १३.२२ वा. ४.८४ मीटर, ३ सप्टेंबर १.५२ वा. ४.६४ मीटर, २८ सप्टेंबर ११.०० वा. ४.५६ मीटर, २९ सप्टेंबर ११.३७ वा. ४.७९ मीटर, ३० सप्टेंबर ८.०० वा. ४.७४ मीटर.

मान्सूनपूर्व तयारीत उधाणाचा समावेश आहे. किनारपट्टी लगतच्या लोकांना उधाणाचा तडाखा बसत असतो, त्यामुळे किनारी भागातच उपाययोजना कराव्या लागतात. ४.५० मीटर उंचीच्या लाटांमुळे नुकसानीचे प्रमाण जास्त असतो, नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत.