25.4 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeMaharashtraकोकणातील चौघांचा विमान अपघातात मृत्यू...

कोकणातील चौघांचा विमान अपघातात मृत्यू…

काही नागरिक मिळून एकूण मृतांचा आकडा शुक्रवारी २६५ वर पोहोचला आहे.

गुरूवारी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्रातील ८ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यामध्ये विमानातील क्रू मेंबर्स (विमानातील स्टाफ) असून त्यातील ४ जणं कोकणातील आहेत. या अपघातात कोकणातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, रायगडमधील पनवेल, रत्नागिरीमधील चिपळूण आणि मंडणगड येथील ४ जणं प्राणाला मुकले असून कोकणवासियांवर या अपघाताने मोठा घाला घातला आहे. दरम्यान अहमदाबाद विमानं दुर्घटनेत २४१ प्रवाशांसह काही नागरिक मिळून एकूण मृतांचा आकडा शुक्रवारी २६५ वर पोहोचला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ८ जणांनी जीव गमावला आहे. हे ८ जण अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते. यामध्ये ३ क्रू मेम्बर आणि १ पायलट तसंच १ दाम्पत्य आहे. यातील चौघे कोकणातील आहेत.

कोकणवर घाला – कोकणातील दीपक पाठक (बदलापूर), अपर्णा महाडिक (मूळगाव धामेली, ता. चिपळूण सध्या वास्तव्य गोरेगाव, मुंबई), रोशनी सोनघरे (मूळ गाव मंडणगड, जि. रत्नागिरी, सध्या वास्तव्य डोबिंवली) आणि रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील मैथिली पाटील यांचा अपघातात मृत्यू ओढवला आहे. त्याचबरोबर सुमित सभरवाल (पवई, मुंबई), महादेव पवार (सोलापूर), आशा पवार (सोलापूर), क्लाईव्ह कुंदर (सध्या रा. मुंबई) यांचाही अपघाती मृत्यू झाला असून महाराष्ट्राने ८ जणांना गमावले आहे.

कोकणातील ज्या चौघांवर मृत्यूने घाला घातला त्यांची माहिती खालीलप्रमाणे – १) दीपक पाठक – दीपक पाठक हे गेल्या १५ वर्षांपासून एअर इंडिया नोकरीला होता. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील त्यांचं कुटुंब कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्स येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. गुरूवारी सकाळीच टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर आपले स्टेटस अपडेट केलं होतं.

२) चिपळूणच्या अपर्णा महाडीक रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावच्या सुनबाई आणि एअर इंडिया या विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या सौ. अपर्णा अमोल महाडिंक (३५) यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे. सौ. अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होल्या. अमोल महाडिक हेदेखील एअर इंडियामध्ये नोकरीला आहेत.

३) रोशनी सोनघरे – सध्या डोंबविलीला राहणारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील सुकन्या रोशनी सोनघरे ही देखील प्राणाला मुकली आहे. २७ वर्षीय रोशनी सोनघरे हिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वे कडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. बालपणापासूनचं स्वप्न रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांची पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. रोशनीला लहानपणापासूनच एअर हॉस्टेस बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. गुरूवारी आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

४) मैथीली पाटील – रायगड जिल्ह्यातील पनवेलची सुकन्या मैथील पाटील हीदेखील या अपघातात मृत्यू पावली आहे. तिचेही लहानपणापासून एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न होते. तिने ते जिद्दीने साकारले. गुरूवारी झालेल्या अपघातग्रस्त विमानामध्ये सेवा बजावत असताना तिला मृत्यूने गाठले.

५) सुमित सभरवाल – अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को-पायलट सुमित सबरवाल याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल यांचे ८८ वर्षाचे वडील एकटेच राहतात. टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्याने सांगितलं होतं. पण त्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमितच्या पश्चात त्याची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे.

६) महादेव पवार आणि ७) आशा पवार सोलापूर जिल्हयातील मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावातील पवार दांपत्याचा विमान अपघातातील मृतांमध्ये समावेश आहे. महादेव पंवार ( वय ६७) आशा पवार (वय ५५) यांनी त्यांचा जीव गमावला आहे. लंडनमध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी ते निघाले होते. त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत आहे.

८) क्लाईव्ह कुंदर – क्लाईव्ह कुंदर पायलट इन कमांड सुमित सभरवाल सह-पायलट होता. मुंबईतील पश्चिम उपनगरात तो वास्तव्यास होता.

RELATED ARTICLES

Most Popular