28.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriचर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

इंधनखर्च, वेळ काढू पणा वाढणार असून अपघाताची शक्यता आहे.

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; परंतु चार्मालय येथील जंक्शनजवळ आराखड्यामध्ये भुयारी मार्ग नसल्याने कोकणनगर येथील नागरिकांना रत्नागिरीत ये-जा करण्यासाठी सर्व्हिस रोड (सबवे) दिसत नसल्याने मोठी डोकेदुखी होणार आहे. कोकणनगरकडे जाण्यासाठी किंवा येण्यासाठी वाहनचालकांना चंपक मैदान किंवा साळवी स्टॉपमार्गे वळसा मारवा लागणार आहे. यामुळे इथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कोणतेही नियोजन नसल्याने इंधनखर्च, वेळ काढू पणा वाढणार असून अपघाताची शक्यता आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम जोरदार सुरू आहे; परंतु या महामार्गाचा आराखडा पाहिला तर त्यामध्ये मोठ्या त्रुटी दिसून येतात. शहरातील चर्मालय येथे मोठे जंक्शन आहे. या चार रस्त्याच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

तशीच वाहतूक सुरू ठेवल्यास अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या ठिकाणी महामार्गाच्या मधोमध वाहने थेट क्रॉस करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी भुयारी मार्ग (सबवे) बांधण्याची मागणी लावून धरली आहे. सबवेमुळे वाहतूक सुरक्षित होईल आणि वाहनचालकांना वळसा मारण्याची गरज भासणार नाही, असे स्थानिकांचे मत आहे; परंतु महामार्गाच्या आराखड्यामध्ये हा रस्ता कोकणनगरच्या वाहनधारकांना थेट रस्ता ओलांडण्यासाठी कोणताही मार्ग ठेवलेला नाही. कोकणनगरकडे जाण्यासाठी किंवा येण्यासाठी वाहनचालकांना चंपक मैदान किंवा साळवी स्टॉपमार्गे वळसा मारावा लागणार आहे. यामुळे वाहनचालकांचा इंधन खर्च वाढणार असून, फुकटचा वेळदेखील जाणार आहे.

सध्याच्या रस्त्याच्या नकाशावरून तरी तसे स्पष्ट होत आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये नाराजी पसरली आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशीही बोलल्यानंतर त्यांनी याची माहिती घेतो, असे सांगितले तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. त्यांनी त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा तपासून बदल करण्याबाबत सुचवले आहे.

रस्त्यातूनच कोकणनगरला जाण्यास मार्ग – याबाबत आमदार किरण सामंत यांना विचारले असता, त्यांनी चौपदरीकरणामधूनच कोकणनगरला जाण्यासाठी पर्यायी रस्ता राहणार असल्याचे सांगितले. कोकणनगरवासीयांची जरी ही सोय झाली असली तरी हा पर्याय अधिक धोकादायक असणार असल्याचे सांगण्यात येते.

RELATED ARTICLES

Most Popular