28.5 C
Ratnagiri
Sunday, September 7, 2025

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeChiplunसावर्ड्यात फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली २१ लाखांची फसवणूक

सावर्ड्यात फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली २१ लाखांची फसवणूक

दीपक सावर्डेकर यांची सावर्डे येथे फ्रेन्ड डेव्हलपर्स नावाची कन्स्ट्रक्शन फर्म आहे.

सावर्डे येथे दोन फ्लॅट बुक करून दोन वर्षे उलटली तरी सदनिकेचा ताबा दिला नाही. या प्रकरणी एकाची २१ लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी दीपक सखाराम सावर्डेकर (रा. सावर्डे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दिगंबर शंकर सावर्डेकर (रा. अंधेरी-मुंबई) यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपक सावर्डेकर यांची सावर्डे येथे फ्रेन्ड डेव्हलपर्स नावाची कन्स्ट्रक्शन फर्म आहे. त्यांच्या ओळखीचे असणारे दोन फ्लॅट बुकिंग करण्यास दिगंबर सावर्डेकर यांना सांगितले.

त्यावर विश्वास ठेवून दीपक सावर्डेकर याने कोणतीही कागदपत्रे तयार न करता फिर्यादी दिगंबर सावर्डेकर व पत्नी शर्मिला सावर्डेकर यांच्याकडून सदनिकेकरिता ४९ लाख ५० हजार रूपयांचा व्यवहार ठरला होता. त्यातील २१ लाख रुपये दिले होते. २०२३ ते २०२५ या कालावधीत हे व्यवहार झाले. मात्र ठरलेल्या मुदतीत सदनिका उपलब्ध झाली नाही. शिवाय फ्लॅट बुकिंगकरिता गुंतवलेले २१ लाख रूपये परत न देता पत्नीची देखील फसवणूक झाली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular