रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी सीए ब्रँच आणि बँक आँफ इंडियातर्फे रत्नागिरी झोनल आँफिस व यांच्या सहकार्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांना लागू असणा-या विविध योजनांची माहिती देण्याकरिता मोफत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. उदया दि. १७ जुलैला संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत वेबिनार होणार असून त्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
अशा प्रकारचे वेबिनार घेतल्याने त्याचा उपयोग उदयोन्मुख लहान मोठे उद्योजक असतात, त्यांना नक्कीच होतो. कोरोना काळामध्ये अनेकांनी आपल्या नोकर्या गमावल्या असून, उदर निर्वाहासाठी काही न काही व्यवसाय करताना अनेक जण दिसतात. परंतु, आवश्यक असणारे मार्गदर्शन, तांत्रिक ज्ञान, अद्ययावत माहिती यांची कुठेतरी कमतरता जाणवते, अशा सर्वासाठी हा वेबिनार उपयुक्त ठरणार आहे.
केंद्र व राज्य सरकारी योजना, तसेच सबसिडी व इन्सेंटिव स्कीम, समाधान योजना यासंबंधी वेबीनारमध्ये तज्ञ माहिती देणार आहेत. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना कोणत्या योजना, कोणासाठी उपयुक्त आहेत, यांचीही माहिती देण्यात येणार आहे. तसेच जागा मिळवण्यासाठीच्या कार्यपद्धतीची माहिती मिळेल. बँकेच्या विविध कर्ज सहायता योजना यासंबंधी प्रत्यक्ष बँक अधिका-यांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून असलेल्या शंकाचे समाधान करून घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे सी.ए. ब्रँच अध्यक्ष सीए आनंद पंडित आणि बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार यांनी जास्तीत जास्त इच्छुकांनी यामध्ये नोंदणी करून वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
नाव नोंदणीसाठी खालील लिंकवर जावे.
उदया १७ जुलै रोजी संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत झूम आणि यूट्यूबद्वारे सदर वेबिनार संपन्न होणार असून, यामध्ये सीए महेश्वर मराठे, संतोष कोलते, प्रशांत पाडळकर, कुमार प्रमोद सिंह वरील संबंधित विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. नावनोंदणी करणा-यांनाच या वेबीनारची लिंक देण्यात येईल.