25.2 C
Ratnagiri
Sunday, December 7, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriरत्नागिरी दुचाकी वाहनांसाठी MH08AZ ही नवीन मालिका सुरु

रत्नागिरी दुचाकी वाहनांसाठी MH08AZ ही नवीन मालिका सुरु

प्रत्येकाला स्वत:ची गाडी आणि त्याच्या नंबर प्लेट बद्दल प्रचंड जिव्हाळा असतो. चारचाकी असो अथवा दुचाकी परंतु तिची नंबर प्लेट, सिरीज काहीतरी युनिक़ असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काही जण तर मनाजोगी नंबर प्लेट मिळविण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करायला सुध्दा मागे पुढे बघत नाहीत. अनेक जणाच्या नंबर एक पण सिरिज वेगळ्या अशा एक न अनेक संकल्पना असतात.  

सध्या रत्नागिरीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये दुचाकी वाहनांसाठी MH08AZ ही नवीन मालिका १३ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. ज्या वाहनधारकांना आकर्षक क्रमांक आगाऊ आरक्षित करावयाचा आहे त्यांनी त्या वाहन क्रमांकासाठी असलेल्या विहीत शुल्काच्या रक्कमेचा धनाकर्ष १३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेजपर्यंत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक खाजगी वाहन विभाग यांचेकडे सादर करावयाचा आहे.

धनाकर्ष राष्ट्रीयकृत बँकेचा व Dy RTO RATNAGIRI यांच्या नावाने असणे गरजेचे आहे. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, अशा अर्जदारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकासाठी जादा शुल्काचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात १४  डिसेंबर २०२१  रोजी वरिष्ठ लिपिक खाजगी वाहन विभाग यांचेकडे सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत सादर करावा असे सुचविण्यात आले आहे.

एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांचे दालनात १४  डिसेंबर २०२१  रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular