31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeIndiaजानेवारीपासून लहानग्यांच्या लसीकरणाला हिरवा सिग्नल – पंतप्रधान

जानेवारीपासून लहानग्यांच्या लसीकरणाला हिरवा सिग्नल – पंतप्रधान

लहान वयोगटाच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणताच अधिकृत निर्णय घेण्यात येत नव्हता. अखेर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा करून लहानग्यांच्या लसीकरणाला हिरवा सिग्नल दिला आहे. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधी ग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले आहे.

नवीन वर्षापासून, जानेवारी महिन्यापासूनच देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले आहे. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

देशात कोरोना आणि त्याच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी रात्री ९.४५ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी ओमायक्रॉनच्या वेगवान संसर्गाबद्दल सतर्कतेच आवाहन नागरिकांना केले. त्यामध्ये मोदी म्हणाले की, जगातील अनेक देशांत ओमायक्रॉनची साथ पसरली असून आपण घाबरून न जाता सावधानता बाळगण्याची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनामध्ये त्यांनी तीन मोठे निर्णय देशवासीयांसमोर जाहीर केले आहेत. त्यामध्ये १५ ते १८ वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना प्रतिबंधित लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घोषणेचे विशेष स्वागत केले आहे. सध्या शाळा सुरु झाल्या असून, लहान वयोगटातील मुलांसाठी सुद्धा लस उपलब्ध झाल्याने हि नक्कीच सकारात्मक बातमी आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असं मुख्यमंत्री त्यावर म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular