27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriअॅल्युमिनिअम प्रकल्पबाधितांचा मोर्चा, एमआयडीसीच्या धिक्काराच्या घोषणा

अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधितांचा मोर्चा, एमआयडीसीच्या धिक्काराच्या घोषणा

एमआयडीसीच्या भोंगळ कारभाराचा धिक्कार करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा.

उद्योग न आणता समाजाला फुकट जमीन वाटणाऱ्या एमआयडीसीचा धिक्कार असो, शासनाच्या नाकर्तेपणाच धिक्कार असो, अशा घोषणा देत अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरी संघाने साळवीस्टॉप ते एमआयडीसी कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढला. रत्नागिरी अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरी संघाचे प्रभारी अध्यक्ष राजेंद्र आयरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सकाळी साडेदहा वाजता साळवी स्टॉप येथून निघाला. शासन आणि एमआयडीसीच्या कार्यालयाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. अॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरी संघातर्फे प्रकल्पबाधितांनी न्यायहक्कासाठी यापूर्वी ९ जुलैला शेतामध्ये लावणी केली.

त्यानंतर २२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर निर्धार मोर्चा काढला होता. जमिनी संपादन करून पन्नास वर्षे झाली तरी त्यावर कोणताही प्रकल्प आलेला नाही. एमआयडीसीच्या ताब्यात ही जमीन आलेली आहे. भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना त्यापैकी काही जमीन कसण्यासाठी द्यावी किंवा त्याचा चांगला मोबदला मिळावा, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. एवढी आंदोलने करूनही आजतागायत सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या भोंगळ कारभाराचा धिक्कार करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आयरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular