27.3 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriमहागाई विरोधात राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

महागाई विरोधात राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

मागील दोन वर्षापासून दिवसेंदिवस वाढणाऱ्या इंधनाच्या वाढीमुळे सर्व सामान्य जनता होरपळून निघाली आहे. पेट्रोल, डीझेल बरोबर आत्ता घरगुती सिलेंडरच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सामान्य माणसाने जगायचे तरी कसे? या सर्व वाढत्या महागाईमुळे जनसामान्यांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे.

एकतर कोरोनाच्या या काळामध्ये गेल्या दीड वर्षापासून काही जण बेरोजगार, तर काहींचे उद्योग धंदे पूर्ण बंद झाले आहेत. सामान्य मनुष्य जीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातून सावरत संसाराची घडी बसवताना तारेवरची कसरत होत आहे, आणि उत्पन्नाचे साधन काहीही नसताना, महागाई मात्र डोईजड झाल्याने सामान्य जनता हतबल झाली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्याची झळ मात्र सामान्य जनतेला बसत आहे.

वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात निषेध व्यक्त केला आहे. तसे निवेदनही तहसीलदारांना देण्यात आले आहे. पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या किमती कमी करण्यासाठी त्यांनी निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी  तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत रोष व्यक्त केला. या सर्वांच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, सीमा चाळके,  तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, उपाध्यक्ष सचिन पटेकर, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष सिद्धेश लाड, अल्पसंख्याकचे शहर अध्यक्ष कादीर परकार,  दीपक चव्हाण, सोशल मीडियाचे अध्यक्ष सचिन साडविलकर, युवकांचे सचिव अक्षय केदारी, युवती शहर अध्यक्ष जान्हवी फोडकर, राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रणिता घाडगे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीयश कदम यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular