25.1 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriखेडशीच्या विकासासाठी ९ कोटी ९१ लाख - पालकमंत्री उदय सामंत

खेडशीच्या विकासासाठी ९ कोटी ९१ लाख – पालकमंत्री उदय सामंत

खेडशी गावाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.

तालुक्यातील खेडशी गावात ९ कोटी ९१ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाली. खेडशी गावाच्या विकासासाठी तुमचा आमदार कटिबद्ध आहे, असे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी दिले. या कार्यक्रमाला उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री सामंत म्हणाले, खेडशीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करून गावाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खेडशी गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देता आला. मी जेव्हा मतदारसंघातील लोकांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा मला तुमच्यापासून ऊर्जा मिळते. त्या बळाबर मी काम काम करत आहे.

निवडणुका जवळ आल्या की काळी मांजरे फिरायला लागतात आणि तुम्ही निवडून दिलेल्या आमदाराला आव्हान करतात. मात्र, रत्नागिरीच्या मतदारांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. तोपर्यंत मला कुणाचीच भीती नाही. मी आज तुमच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये राजकारणात काम करतो. याची मला जाणीव आहे. अनेक कार्यकर्ते कधी-कधी नाराज होतात. मात्र माझ्याबरोबर जेवढे कार्यकर्ते असतात त्यांना मी समानतेची वागणूक देतो, हे ही विसरून चालणार नाही. मी दिलेले शब्द पूर्ण केले आहे. आता खेडशीवासीयांचे आशीर्वाद मागण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे.

तुम्ही कार्यक्रमाला जी गर्दी केली त्या गर्दनि तुम्ही उदय सामंत यांचेच असल्याचे दाखवून दिले आहे. खेडशी येथील कार्यक्रमात पालकमंत्री सामंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी तालुका प्रमुख बाबू म्हाप, सरपंच जानवी घाणेकर, उपतालुका प्रमुख भिकाजी गावडे, आबा बंडबे, रमेश कसबेकर, पिंट्या साळवी, हर्षल पाटील, मिलिंद खानविलकर, श्रीकांत रानडे, देवदत्त पेंडसे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular