27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunगॅबियन वॉल संरक्षण नव्हे धोका - परशुराम घाट

गॅबियन वॉल संरक्षण नव्हे धोका – परशुराम घाट

पेढे येथील लोकवस्तीत व शेतात चिखल साचल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाट पावसाळ्यात धोकादायक बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. घाटात रस्ता खचलेल्या भागास संरक्षण म्हणून उताराच्या बाजूस गॅबियन वॉल उभारण्यात येत आहे; मात्र भरपावसात ही वॉल ढासळू लागल्याने त्यातील माती पाण्याबरोबर पायथ्याशी असलेल्या ग्रामस्थांच्या शेतात व घराच्या परिसरात आली. पावसाळ्यात या वॉलची दुरुस्ती होऊ शकत नाही, त्यामुळे शेत व घराच्या परिसरात आलेला चिखल जेसीबीच्या साह्याने काढण्यात येत आहे. परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम मार्गी लागल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात धोकादायक ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळ्या आणि उताराच्या बाजूस गॅबियन वॉल उभारण्यात येत आहे. गतपावसाळ्यात येथील गॅबियन बॉल कोसळली आहे. तर तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात पुन्हा गॅबियन वॉल ढासळण्याचा प्रकार घडला आहे. गॅबियन वॉल कोसळू नये तसेच तेथून पाण्यासोबत माती वाहू जाऊ नये यासाठी तेथे प्लास्टिक टाकले आहे; मात्र तरीही तेथील माती पाण्यासोबत लोकवस्तीत येत आहे.

पेढे येथील लोकवस्तीत व शेतात चिखल साचल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीकडून ग्रामस्थांच्या शेतात व घराच्या परिसरात साचलेला चिखल हा जेसीबीच्या साह्याने काढण्यास बुधवारी सुरुवात केली. परशुराम घाटास केलेल्या उपाययोजना तोकड्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पावसाळ्यापूर्वीच गॅबियन वॉलचे काम मार्गी लागण्याची आवश्यकता होती; मात्र हे काम मार्गी न लागल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. यापूर्वी परशुराम घाटात डोंगरकटाई करताना घाटातील भलेमोठे दगड लोकवस्तीत येऊन घराला तडे गेले होते. तर २०२१च्या अतिवृष्टीत घाटातील दरड खाली येऊन एक घर उद्ध्वस्त झाले अन् त्यात दोघांनी जीव गमावला होता. त्यामुळे पावसाळ्यात पेढे येथील ग्रामस्थांना परशुराम घाटाची चिंता सतावू लागली आहे.

ग्रामस्थ आक्रमक – ढिसाळ कारभार आणि कामाबाबत ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी संपूर्ण गावाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. ही बैठक घेण्याच्या हालचाली सुरू होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular