25.6 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunपावसामुळे थांबवले गॅबियन वॉलचे काम - परशुराम घाट

पावसामुळे थांबवले गॅबियन वॉलचे काम – परशुराम घाट

लोखंडी जाळी बसवण्याचे काम मात्र अंतिम टप्प्यात आले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गॅबियन वॉलचे काम पावसामुळे थांबवले आहे. आता पावसाळ्यानंतरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी या गॅबियन वॉलच्या रचनेत काही बदल करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केले जात आहेत. त्याबाबतचे नियोजन आतापासूनच सुरू आहे. एकीकडे गॅबियन वॉलचे काम थांबले असले, तरी दुसरीकडे लोखंडी जाळी बसवण्याचे काम मात्र अंतिम टप्प्यात आले आहे. परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम मार्गी लागल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात धोकादायक ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळ्या आणि उताराच्या बाजूस गॅबियन वॉल उभारण्यात येत आहे. गतपावसाळ्यात येथील गॅबियन वॉल कोसळली होती.

यावर्षी पहिल्याच पावसात गॅबियन वॉल ढासळण्याचा प्रकार घडला. यामुळे पायथ्यालगत असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाल्याने तातडीने हे काम थांबवण्यात आले. त्याशिवाय गॅबियन वॉल कोसळू नये तसेच तेथून पाण्यासोबत माती वाहू जाऊ नये यासाठी तेथे प्लास्टिक टाकण्यात आले; मात्र तरीही तेथील माती पाण्यासोबत लोकवस्तीत येत आहे. पेढे येथील लोकवस्तीत व शेतात चिखल साचल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीकडून ग्रामस्थांच्या शेतात व घरपरिसरात साचलेला चिखल हा जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला.

ग्रामस्थांची चिंता अजूनही कायम – पावसाळ्यापूर्वीच गॅबियन वॉलचे काम मार्गी लागण्याची आवश्यकता होती; मात्र हे काम मार्गी न लागल्याने ग्रामस्थांची चिंता अजूनही कायम आहे. यापूर्वी परशुरामघाटात डोंगरकटाई करताना घाटातील भलेमोठे दगड लोकवस्तीत येऊन घराला तडे गेले होते, तर २०२१ च्या अतिवृष्टीत घाटातील दरड खाली येऊन एक घर उद्ध्वस्त झाले अन् त्यात दोघांना जीव गमवावा लागला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने खरबदारीची उपाययोजना म्हणून गॅबियन वॉलचे काम तातडीने थांबवले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular