लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आपल्याला विरोधी पक्षातील महत्वाच्या नेत्यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट १५ दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. ही ऑफर कोणत्या नेत्याने दिली होती हे गडकरींनी अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ऑफर कोणी दिली होती? शरद पवार यांनी की सोनिया गांधींनी? असा प्रश्न पत्रकारांनी पुन्हा एकदा विचारल्यानंतरही त्यांनी नाव घेतले नाही. मी याबाबत काही बोलणार नाही.
तुम्ही चर्चा करायला मोकळे आहात असे उत्तर देत त्यांनी प्रश्न टोलवला. राज्यासह देशाच्या राजकारणात अनेकदा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची पंतप्रधान पदी निवड होण्याबाबत चर्चा होते, मात्र पहिल्यांदाच नितीन गडकरी यांना एका कार्यक्रमावेळी मुलाखतीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर कोणी दिली होती? असा गौप्यस्फोट केल्याने गेले १५ दिवस त्याची चर्चा दिल्लीच्या राजकारणात सुरु आहे.
पंतप्रधानपदाची ऑफर – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गंडकरी यांनी ४ जून रोजी अजित पवार रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्यापाठोपाठ पुढील दोन दिवस थोरले पवार म्हणजेच शरद पवार हे देखील येऊन गेले. शनिवारी अजितदादांची सावर्डे येथे जंगी सभा झाली होती. शक्तीप्रदर्शन करण्यात आ. शेखर निकम आणि या मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांना यश आले. सभा यशस्वी झाल्यामुळे अजितदादा खुश झाले. मात्र अवघ्या ४-५ दिवसात. त्यांना दणका मिळाला आहे.
वेगळा गट स्थापन केला – दापोली नगर पंचायतीमधील राष्ट्रवादीच्या ८ पैकी ७ नगरसेवकांनी शुक्रवारी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. खालीद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके, विलास शिगवण, रिया सावंत, अश्विनी लांजेकर या नगरसेवकांनी आपण स्वतंत्र गट स्थापन करीत असल्याचे पत्र दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केले आहे. सध्यातरी त्यांनी पुढील राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही.
तटकरेंनाही दणका – हा जसा अजित पवारांना दणका आहे तसाच तो या मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांनाही धक्का असल्याचे बोलले जात आहे. तटकरे यांच्या रायगड लोकसभा मतदार संघात दापोली मतदार संघाचा समावेश होतो. त्यामुळे अजितदादांसह तटकरेंनाही पक्षांतर्गत दणका मिळाल्याची चर्चा सुरु आहे.
आदित्य ठाकरेंचा दौरा – पितृपक्ष संपल्यानंतर ४ किंवा ५ ऑक्टोबरला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे दापोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दापोलीत अनेक पक्षांचे कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या ७ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत.