29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दल सक्रीय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दल सक्रीय

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जिल्ह्यातील ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोणतेही गैरकार्य घडणार नाही असा बॉण्ड घेतला आहे.

रत्नागिरीमध्ये उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी जिल्हा पोलिस दल सक्रीय झाले असून, जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या सुमारे ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यातील १५५ जणांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली गेली असून त्यावर येत्या दोन दिवसामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलिस दलातर्फे जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर विविध ठिकाणी २५० बैठका घेण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गर्ग पुढे म्हणाले, कोकणामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. कोकणातील हा सर्वांत मोठा सण असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची विशेष खबरदारी आम्ही घेतली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जिल्ह्यातील ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोणतेही गैरकार्य घडणार नाही असा बॉण्ड घेतला आहे.

त्याचप्रमाणे विशिष्ट भागात राहून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील १५५ जणांवर तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसामध्येच त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये येण्याचे दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे मार्ग आणि दुसरा महामार्गाचा समावेश आहे.

रेल्वे मार्गासाठी आम्ही विशेष प्रयोजन आखलेले आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे आरक्षण महत्त्वाचे आहे. ज्याचे आरक्षण कन्फर्मअसेल, त्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पुढील प्रवासासाठी एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करता लागू नये, आणि प्रवास निश्चिंतपणे पार पडावा यासाठी २० मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, काही वेळा अपघातासारख्या दुर्घटना घडल्यास तत्काळ मदतकार्य उपलब्ध व्हावे यासाठी रुग्णवाहिका, आरोग्य पथक, क्रेन, जेसीबी यांची सुविधा उपलब्ध केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular