29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunचिपळूण तालुक्यात होते गांजाची शेती, पोलिसांना अद्याप नाही गंधवार्ता

चिपळूण तालुक्यात होते गांजाची शेती, पोलिसांना अद्याप नाही गंधवार्ता

आधी आजोबा, वडील गांजा व्यवसाय करत होते. आता त्यांची मुले या व्यवसायात उतरली आहेत.

जिल्ह्यात चरस, गांजा, ब्राऊन हेरॉईनसारखे अमली पदार्थ बाहेरगावातून येत आहेत. त्याशिवाय चिपळूण तालुक्यात गांजाची शेती केली जात आहे. काहीजण पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करत असल्यामुळे तालुक्यात सहज गांजा उपलब्ध होत आहे; मात्र या शेतकऱ्यांची पोलिस प्रशासनाला अद्याप माहिती मिळालेली नाही. गांजाचा वास उग्र असतो. एखाद्याने गांजा ओढला असेल किंवा तो बाळगला असेल तरी वासाने लक्षात येते. मुंबई- गोवा महामार्गावर चिपळूणपासून जवळ असलेल्या काही गावांमध्ये गांजाची शेती केली जाते. त्याशिवाय शहराच्या उपनगरांमध्येही गांजाची शेती केली जात आहे. गांजा लागवडीच्या या व्यवसायात काही जण पारंपरिक पद्धतीने काम करत आहेत.

आधी आजोबा, वडील गांजा व्यवसाय करत होते. आता त्यांची मुले या व्यवसायात उतरली आहेत. काहीजण डोंगर उतारावर तर काही तूर व अन्य कडधान्य पिकात गांजा पिकवतात. त्यामुळे गांजा स्थानिक पातळीवरही सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. जे लोक गांजाची नशा करतात ते वासावरून गांजा विक्रीची ठिकाणे शोधत जातात. गणपती उत्सवासाठी मुंबईतील अनेक चाकरमानी चिपळूणमध्ये आले होते. यातील गांजाचे सेवन करणाऱ्या अनेक तरुणांनी वासावरून गांजा विक्रीची ठिकाणे शोधली होती. गावात आल्यानंतर अजूनही ते त्याच ठिकाणी जाऊन गांजा खरेदी करत असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांना मात्र अजून गांजाची शेती करणाऱ्यांचा शोध लागलेला नाही.

कारवाईचा आलेख चढता – जिल्ह्यात २०२१ मध्ये तब्बल २२ गुन्हे घडले होते. तर २०२२ मध्ये एकूण १२ गुन्हे घडले होते. २०२३ मध्ये केवळ रत्नागिरीमध्ये ७ प्रकरणात १४ लोकांना अटक झाली आहे. मागील १५ दिवसांत चिपळूणमध्ये सात लोकांना अटक झाली आहे. हे प्रमाण पाहता यावर्षी असे गुन्हे आणि पोलिसांची कारवाई वाढली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular