रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. फैजल मकसूद मस्कर, वय वर्षे २८ असे या संशयिताचे नाव आहे.
२५ जून ची ही घटना आहे. कर्ला येथील हा संशयित रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या आवारात मोटर सायकल पार्किंग मध्ये उभा होता, त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती आणि संशयित रित्या तो आवारामध्ये फिरत होता. त्याच्या हालचालींवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस गस्त घालत असताना फैजल याला पकडले अधिक विचारपूस आणि पिशवीची तपासणी केली असता पोलिसांना त्याच्याजवळ ७५ ग्रॅमचा गांजा हा अमली पदार्थ सापडून आला.
सदर अमली पदार्थ गांजा हा जवळ बाळगणे किंवा तो विकणे हा फौजदारी गुन्हा आहे. फैजल जवळ सापडलेल्या ७५ ग्रॅमचा १८७५ रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन डोमणे यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.