24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriगणपतीपुळे येथील बाप्पाचे गाभाऱ्यातील दर्शन घेणे आत्ता शक्य

गणपतीपुळे येथील बाप्पाचे गाभाऱ्यातील दर्शन घेणे आत्ता शक्य

मागील वर्षी सुरु झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली होती. अद्यापही कोरोनाची दुसरी लाट संपली नसून, कमी अधिक प्रमाणामध्ये बाधित रुग्ण सापडत आहेत. रत्नागिरीमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाले असून, हळू हळू कोरोनाची लाट आटोक्यात येईल असे मानले जात आहे.

रत्नागिरी तिसऱ्या टप्प्यामध्ये अनलॉक झाल्यावर सर्व दुकाने, हॉटेल्स उघडण्यात आलीत. पण देवाचे दरवाजे मात्र अजून बंदच ठेवण्यात आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच प्रमुख मंदिरे अद्याप बंद ठेवण्यात आली आहेत. येणाऱ्या पर्यटकांची मंदिर बंद म्हणून निराशा होऊ नये यासाठी गणपतीपुळे देवस्थानाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरीतील तीर्थक्षेत्र असलेल्या असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारावर दर्शनासाठी देवस्थानने टीव्ही बसविला असून त्यावरून थेट बाप्पाचे गाभाऱ्यातील दर्शन घेणे आत्ता शक्य होणार आहे.

रत्नागिरीमध्ये पर्यटकांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र असलेल्या गणपती मंदिर परिसरातही पर्यटक व भाविक वीकेंड साजरा करायला येत आहेत, पण मंदिर बंद ठेवण्यात आल्याने, भक्तगण गणपती मंदिराच्या समोर असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभे राहून मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. अनेक भक्तांनी याबाबत देवस्थानाकडे नाराजी व्यक्त केली.

अखेर येणाऱ्या भक्तांना गणपती मंदिराच्याच्या गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन व्हावे याकरिता देवस्थान कमिटीने आता गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर टीव्ही लावून गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घडवून आणण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला आहे. त्यामुळे भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular