28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeMaharashtraअनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर, दहशतवाद्यांचा घातपाताचा कट

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर, दहशतवाद्यांचा घातपाताचा कट

दहशतवादी हल्ल्याबाबत आलेल्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं आहे.

महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकत्रितपणे दहशतवादी मॉड्यूल संबंधित काल, शनिवारी जोगेश्वरी येथून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी आज पुन्हा एक मोठी कारवाई केली असून, मुंबईमध्ये हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या एका गुन्हेगाराला मुंब्रामधून एटीएस पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव इमरान उर्फ मुन्ना भाई असल्याचे समजते आहे.

दहशतवाद्यांचा अनंत चतुर्दशीच्या मुहूर्ताच्या गर्दीचा फायदा घेऊन, मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये विषारी वायू सोडून घातपात करण्याचा डाव असल्याची धक्कादायक माहिती समजली होती. त्यानंतर सर्व मुख्य रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान दहशतवादी हल्ल्याबाबत आलेल्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी हे ऑपरेशन राबवण्यात आले असून, मुंबई पोलिसांच्या या राबवलेल्या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत ५७ सराईत आरोपींना अटक केली असून अजामीनपात्र वॉरंटमधील ५५ आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी शहरामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकूण ३१ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चाकू, तलवारी इत्यादी शस्त्रे जप्त करण्यात आलीत. त्याचप्रमाणे, ४८ ठिकाणी छापे मारण्यात आले असून, त्यामध्ये अवैध दारू विक्री, जुगार प्रकरणे समोर आली आहेत. या छापेमारीमध्ये ७६ आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी या ऑपरेशन दरम्यान ४१ आरोपींना अटक देखील केली आहे. आणि १६० संशयिताना आणि ११३ फेरिवाल्यांवर देखील कारवाई केल्याचे समजते आहे. आज मुंबईतल्या अनेक गणपती बाप्पाचं विसर्जन होणार असल्याने, अनेक ठिकाणी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

चौपाटी परिसरामध्ये गर्दी उसळू नये यासाठी विशेष नियंत्रण आणि काळजी घेतली गेली आहे. शहरात आज विशेष बंदोबस्त ठेवला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पोलिसांसह सशस्त्र पोलीस दलाचे दीड हजार जवान देखील सुरक्षेखातर तैनात करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular