22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriगणपतीपुळे मार्गातील “ते” लाकडी खांब तत्काळ हटवण्यात आले

गणपतीपुळे मार्गातील “ते” लाकडी खांब तत्काळ हटवण्यात आले

गणपतीपुळे देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत भाविकांना काहीही त्रास उद्भवू नये यासाठी संपूर्ण नियोजन करत आहेत.

आज अंगारक चतुर्थी असल्याने तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळेत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावणार आहेत. त्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत भाविकांना काहीही त्रास उद्भवू नये यासाठी संपूर्ण नियोजन करत आहेत. यासाठी वाहतुकीबाबत संस्थान आणि ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे.

गणपतीपुळे मंदिराकडे जाणार्‍या मुख्य आपटातिठा मार्गावरील सध्या अर्धवट अवस्थेत असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे लाकडी खांब ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते ते लाकडी खांब तत्काळ हटवण्याचे मुख्य काम गणपतीपुळे ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा गणपतीपुळे देवस्थानचे मुख्य पुजारी अमित घनवटकर आणि पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन पाटील, गणपतीपुळेत शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नाने हटवण्यात आले आहेत.

तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे कायमच भाविकांची वर्दळ असते आणि या तीर्थक्षेत्राचे सुशोभिकरण करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरूच असतात. सध्या येथे सुरु असलेल्या आपटातिठा मार्गावरील स्वागत कमानीचे काम अर्धवट राहिले असून तिथे असलेले लाकडी खांब रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाह्तुकीला देखील अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आणि आज अंगारकी संकष्टी निमित्त मंगळवारी ता. १३ सप्टेंबर रोजी अलोट गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते खांब तत्काळ हटवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

श्रीक्षेत्र गणपतीपुळेतील मार्गावर सध्या स्वागत कमान बांधण्याचे काम सुरू असल्यामुळे येणार्‍या भाविक व पर्यटकांची वाहने कमानीच्या बाहेरील पर्यायी मार्गाने ये-जा करत करतात. तसेच इतर सर्वच वाहनांसाठी हा पर्यायी मार्ग केलेला असताना अंगारकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेता दोन्ही मार्गांनी वाहतूक सुरळीत चालू राहता यावी आणि वाहतुकीला कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular