25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeRatnagiriरत्नागिरीनजीक महामार्गावर सीएनजी टँकरमधून गॅस गळती

रत्नागिरीनजीक महामार्गावर सीएनजी टँकरमधून गॅस गळती

खड्ड्यात आपटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत होता.

रत्नागिरी शहराजवळ टीआरपी येथे डीमार्ट समोर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाली. यावेळी अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हा प्रकार घडल्यानंतर एमआयडीसी आणि नगर परिषद अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने होणारा मोठा अनर्थ टळला. दरम्यान, गॅस लिकेजवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे सुमारे तासभरापेक्षा जास्त काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कुवारबावकडून एका खासगी गॅस कंपनीचा टँकर रत्नागिरीच्या दिशेने येत होता. हा टँकर कुवारबाव परिसरातील डीमार्ट समोरील ठिकाणी मुख्य रस्त्यावर आला असता त्यातून गॅस गळती सुरू झाली. खड्ड्यात आपटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत होता.

दोन व्हॉल्व्हमधून ही गॅस गळती सुरू झाली होती. त्यामुळे इतर वाहनधारकांची तारांबळ उडाली. या गॅस गळतीवर नियंत्रण रखिण्यासाठी व अनर्थ टाळण्यासाठी तातडीने अग्निशमन पथकांना बोलावण्यात आले. पोलिस यंत्रणाही दाखल झाली. घडल्या प्रसंगाने या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. एमआयडीसी अग्निशमन पथक अधिकारी सुरेश गोल्लार व ६ जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगर पालिका अग्निशमन पथकातील नरेंद्र मोहिते, शिवम शिवलकर, सलीम चांदावाले, यश वालम, पोलिस दल कर्मचारी संतोष गायकवाड, लक्ष्मण कोकरे हे देखील घटनास्थळी धावले. गॅसवाहू टँकरमधून गळती होणारा गॅस थांबविण्यासाठी तत्काळ प्रयत्न हाती घेण्यात आले. त्या गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular