‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून सुप्रसिध्द असलेल्या दस्तुरखुद्द गौतमी पाटीलचा रंगारंग कार्यक्रम आज मंगळ. दि. ६ जाने. रोजी सापुचेतळे, ता. लांजा येथे मोठ्या जल्लोषात व प्रचंड गर्दीत संपन्न झाला. हा कार्यक्रम ‘लांजा निरुळ संघटने’च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लांजा, राजापूर, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी फार मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित होती. उडी मारुन स्टेजवर एन्ट्री गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटल्यानंतर तरुण मंडळी हटकून येतात, तसे येथेही झाले. तरुण व चोखंदळ रसिक मंडळी फार मोठ्या संख्येने उपस्थित होती. गौतमी पाटीलने मोठ्या जोशात व नेहमीच्या रुबाबात उडी मारुन स्टेजवर एन्ट्री’ केली. सोबत तिचा तरुणींचा खासा वाद्यवृंद होता. कार्यक्रम मोठ्या शहरांपासून दूर सापुचेतळे येथील अंतर्गत भागात असलेल्या वाघ्रट येथे आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे रसिक मंडळी निर्धास्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित होती.
रसिक मान्यवर बेभान – गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु होताच सारे वातावरण भारुन गेले.. आणि मग तरुण रसिक मंडळींचा ओसंडून वाहू लागला.. काही मंडळी नाचू लागली, गाऊ लागली, चक्क गड्या घालून लागली, एकमेकांच्या डोक्यावर उभे राहून कार्यक्रमाचा दिल्टण त्याला तितकीच जोरदार श्रोत्यांनी साथ दिली. गौतमी पाटीलने मधाळ आवाजात सांगितले की, “केवळ रसिक जनांसाठी मी इथे आले … तेंव्हा तुम्ही ‘वन्स मोअर’ मागा, तुम्हाला हवा तो डान्स पुन्हा सादर करते.” त्यानंतर समस्त रसिकांनी ‘वन्स मोअर’चा गजर केला आणि गौतमी पाटीलने एक बहारदार डान्स हा एकदा जोरदारपणे सादर केला.

