पुण्याहून कोकणात फिरण्यासाठी आलेल्या ४ मित्रांचा ग्रुप फिरत असताना पावसच्या पुढे काही अंतरावर असलेल्या गावखडी समुद किनाऱ्याकडे आकर्षित होऊन फिरण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकजण रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास गावखडी समुद्रात बुडाला. त्याचा शोध घेणे सुरु होते. मात्र आज अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे. आकाश पांडुरंग सुतार वय २८ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश पांडुरंग सुतार, राजकुमार शेषराव पिटले, कृष्णा ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी आले होते. रविवारी सकाळी ११ वा. गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आकाश सुतार समुद्रात पोहण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्याने समुद्रकिनारी बसून राहिले होते. पाण्याचा जोर वाढल्याने आकाश गटांगळ्या खाऊन बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले.
यावेळी त्यातील एक मित्र राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतऋण त्याला वाचवायला जायचा प्रयत्न केला. परंतु आकाश कुठेच दिसून आला नसल्याने, त्या मित्रांनी तातडीने जवळच असलेल्या एका दुकानदाराला माहिती देऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने पोलीस अंमलदार व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत आकाशचा शोध लागला नव्हता. मात्र आज त्याचा मृतदेह आढळून आला.
फिरण्यासाठी आलेल्या मित्रांसोबत अशी दुर्घटना घडल्याने, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. असे काही धक्कादायक आपल्यासोबत घडेल याची त्या मित्रांनी कधी कल्पना देखील केली नव्हती असेल. उर्वरित तिघे देखील प्रचंड मानसिक धक्क्यामध्ये आहेत.