29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriगयाळवाडी-खेडशी बंद घर फोडून चोरी, पोलीस तपास सुरु

गयाळवाडी-खेडशी बंद घर फोडून चोरी, पोलीस तपास सुरु

रत्नागिरी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात या चोरीबाबत मयुर मनोहर दरेकर वय ३१, रा. गयाळवाडी खेडशी, तक्रार दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील शहरानजीकच्या गयाळवाडी-खेडशी येथील बंद घराची कडी तोडून अज्ञाताने सोन्याचे दागिने,रोख रक्कम असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार दि. १ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६.३० वा या कालावधीमध्ये घडली आहे. त्यासोबतच खेड मध्ये देखील दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

रत्नागिरी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात या चोरीबाबत मयुर मनोहर दरेकर वय ३१, रा. गयाळवाडी खेडशी, तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवार १ एप्रिल रोजी सकाळी ते आपल्या घराचे सर्व दरवाजे खिडक्या बंद करुन व मुख्य दरवाजाला कुलुप लावून कामावर गेले होते. सायंकाळी ६.३० वा.सुमारास दरेकर जेंव्हा घरी परतले तेंव्हा त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा उचकटलेला दिसून आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना बेडरुममधील लोखंडी व लाकडी कपाटातील लॉकर फोडून त्यातील रक्कम आणि सोन्याचे काही दागिने अज्ञाताने चोरल्याचे लक्षात आले.

सोन्याच्या दागिन्यांमध्ये एक सोन्याची नथ, अंगठी, सोन्याचे आणि चांदीचे कॉईन आणि रोख ४  हजार रुपये असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार कांबळे करत आहे. भुरट्या चोऱ्यांचे कमी झालेले प्रमाण कोरोना काळानंतर पुन्हा वाढले आहे. त्यामुळे पोलीस अजून सतर्क होऊन, भुरट्या चोरांवर लक्ष केंद्रित करून आहेत. त्यामुळे ऐन सणाच्या हंगामात चोरी झाल्याने शेजारच्या परिसरात सुद्धा भीती निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular