28.2 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

कांदळवन कार्यशाळेच्या खर्चाची चौकशी करा – पालकमंत्री उदय सामंत

कांदळवन व वनविभागाकडून नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये...

रत्नागिरीत पोलिस दलात मोटारीसह ई-बाईक दाखल

पोलिसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग वापर जनतेसाठी करावा,...

रत्नागिरीतही आता हाऊसबोटी – पालकमंत्री उदय सामंत

काश्मीर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊसबोटी दाखल झाल्या...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात 'जेरियाट्रिक क्लिनिक'

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘जेरियाट्रिक क्लिनिक’

अपघात विभाग आणि दिव्यांग विभागासमोर रॅम्प उभारण्यात आला आहे.

रत्नागिरी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा घेताना अडचणी येऊ नयेत, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात काही दिवसांपूर्वी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता तपासणीसाठी जाताना किंवा उपचारासाठी जाताना कुठलीच गैरसोय होत नाही. काही जिल्ह्यांमध्ये आठवड्यातून एकदा ‘जेरियाट्रिक क्लिनिक’ सुरू केले आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच दिवशी ज्येष्ठांना उपचार मिळत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून विविध प्रकारचे रुग्ण येत असतात. त्यामुळे या रुग्णालयात सतत गर्दी असते. वृद्धांना उपचार घेताना अनेक अडचणी येऊ नये यासाठी रुग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण कक्ष सुरू करण्यात आल्याने ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळाला आहे.

६० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर बाह्यरुग्ण विभागात त्यांच्या आजारानुसार उपचार केले जातात. याला जेरियाट्रिक क्लिनिक असे म्हटले जाते. जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्याच्या आणि उपचाराच्या सर्व सेवा दिल्या जातात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आरोग्य सेबा अधिक जलद मिळू लागली आहे. जिल्हा रुग्णालयात मेडिसिन, नेत्र सर्जरी, हाडांचे, नाक-कान, मानसिक आदींचे उपचार मिळतात तसेच ईसीजी, एक्स-रे, विविध चाचण्या सुविधाही मिळत आहेत. जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठीच्या या सुविधेबाबत ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी दहा खाटांचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे.

दिव्यांग विभागासमोर रॅम्प – रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही रुग्ण येत असतात. यात वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रासाठीही अनेक दिव्यांगांना यावे लागते. या दृष्टीने येथील अपघात विभाग आणि दिव्यांग विभागासमोर रॅम्प उभारण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular