31.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeChiplunवरिष्ठ निर्णय घेतील, तयारीला लागा मंत्री रवींद्र चव्हाण

वरिष्ठ निर्णय घेतील, तयारीला लागा मंत्री रवींद्र चव्हाण

विरोधकांनी सहा महिने आधी फेक नरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली.

पुढील दोन- तीन महिन्यांमध्ये निवडणुका होणार असल्याने केंद्र व राज्यातील भाजप सरकारने आणलेल्या जनहिताच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा. २०१९ प्रमाणे दगाफटका होऊ नये यासाठी फेक नरेटिव्हना उत्तर देण्याचे काम कार्यकर्ताच करेल. भाजपचे वरिष्ठ नेते काय घ्यायचा तो निर्णय घेतील; पण आपण तयारी करूया. कोकणात भाजपची ताकद लोकसभा व कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसून आली आहे, अशा सूचना भाजप नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा बैठकीत दिले. स्वयंवर मंगल कार्यालयात ही बैठक झाली. या वेळी मंत्री चव्हाण म्हणाले की, २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार होते; परंतु विरोधकांनी सहा महिने आधी फेक नरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली.

अशी वेळ २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा येणार नाही याकरिता फेक नरेटिव्हना कार्यकर्ताच घरोघरी जाऊन उत्तर देणार आहे. विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची गरज असते तेवढे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कोकणात आता सणांचे दिवस सुरू होतील; परंतु सण साजरे करताना देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद मिळतील, असे कार्यक्रम घ्या. प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण क्षमतेने काम करण्यास सुरवात करा, असेही त्यांनी सांगितले. या वेळी आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके आदींसह तालुकाध्यक्ष, जिल्हा, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

माने-सावंत सराव करा – या प्रसंगी कबड्डीमधील गोष्ट सांगताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार बाळ माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना आता पूर्वीसारखा सराव चालू करा, अशा कोपरखळ्या मारल्या. मंत्री चव्हाण म्हणाले, कबड्डीच्या मैदानात काय होतं? चांगले ताकदीचे खेळाडू उतरले, चांगली चढाई करणारे, दिसायला लागले, धावायला लागले की समोरचा संघ म्हणतो आज अ टीम उतरवलेली दिसतेय. समोरचा वयाने थकलेला असेल तर सामन्याला बाय घेतली जाते. बाळासाहेब, असं होऊ शकतं. राजेश सावंत पूर्वीसारखा सराव सुरू करा. कधीही फिट राहिले पाहिजे.

RELATED ARTICLES

Most Popular