28.6 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunमाता न तू वैरीणी! पोटच्या मुलीचा पाण्यात बुडवून खून

माता न तू वैरीणी! पोटच्या मुलीचा पाण्यात बुडवून खून

५ मार्च २०२१ रोजी वहाळ घडशीवाडी येथे राहत्या घरी ही हृदयद्रावक घटना घडली होती.

दुसऱ्या वेळी ही मुलगी झाली म्हणून अवघ्या एक महिन्याच्या चिमुकलीला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून ठार मारल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील शिल्पा प्रवीण खापले असे त्या महिलेचे नाव असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी हा निकाल दिला आहे. दिनांक ५ मार्च २०२१ रोजी वहाळ घडशीवाडी येथे राहत्या घरी ही हृदयद्रावक घटना घडली होती. शिल्पा खापले यांना दोन मुली होत्या. पहिल्या मुलीनंतर आपल्याला मुलगा व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांना दुसऱ्यांदा मुलगीच झाली. मात्र मुलगी झाली म्हणून अवघी एक महिन्याच्या चिमुरडीला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिचा जीव घेतला.

बादलीत बुडवून मारले – या आईने त्या चिमुकलीला खाली डोके वरती पाय अशा पद्धतीने बादलीत बुडवले आणि तिचा खून केला. याप्रकरणी प्रारंभी सावर्डे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र त्यानंतर हे प्रकरण कोणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून संबंधित महिलेने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले. यानंतर पोलिसांनी चौकशी करून चिमुकलीचा खूनच झाला आहे असा संशय आला, त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि अधिक तपास सुरू केला. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी या प्रकरणी सखोल तपास केला आणि आईवरच खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणी गेले अनेक दिवस चिपळूण येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती.

जन्मठेपेची सजा – अखेर सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश डॉक्टर नेवसे यांनी या प्रकरणी मातेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखीन २ वर्षाची वर्षाचा कारावास अशी शिक्षा ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी त्यांनी १५ साक्षीदार तपासले.

१ महिन्याच्या बाळाचा खून सिध्द – मुलाच्या हव्यासापोटी अवघ्या एक महिन्याच्या बाळाची हत्या झाल्याचे या प्रकरणात सिद्ध झाले. यासाठी पोलिसांचा तपास, साक्षी पुरावे, वैद्यकीय अहवाल, शेजारी राहणाऱ्या लोकांचे जबाब व युक्तिवाद घेण्यात आले व त्यामध्ये या महिलेला दोषी ठरवण्यात आले. या तपास कार्यामध्ये पोलीस हवालदार निनाद कांबळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. न्यायालयाने मुलींबाबत सामाजिक दृष्टिकोन विचारात घेऊन एक महिला असूनही मुलाच्या हव्यासापोटी स्वतः च्या पोटच्या मुलीचा खून केल्यामुळे ही शिक्षा सुनावली आहे आणि स्त्री पुरुष समानतेचा संदेश या खटल्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular