24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraआरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं की मला गोळ्या घालायच्या हे तुम्हीच ठरवा : जरांगे

आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं की मला गोळ्या घालायच्या हे तुम्हीच ठरवा : जरांगे

'ही लढाई आता आरपारची आहे, आम्ही मागे हटणार नाही.

‘आता ही लढाई आरंपारची आहे…. आरक्षण द्यायचं की आंदोलन मोडायचं…. की मला गोळ्या घालायच्या हे सरकारने ठरवावं, मी मागे हटणार नाही’ अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी फडणवीस सरकारला सुनावले आहे. आंदोलकांना त्रास देणारे हे सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूर वागत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. सरकारने आंदोलनासाठी आणखी एक दिवसाची परवानगी दिल्यानंतर उपोषणस्थळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलनासाठी एक-एक दिवसाची मुदतवाढ देण्याऐवजी मराठा समाजाला थेट आरक्षण देऊन टाकावे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला त्रास देऊन, त्यांच्या अन्न पाण्याची सोय बंद करून मुंबईतून हाकलण्याचा सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

भंगार खेळ बंद करा – जरांगे म्हणाले, सरकारने मला काल परवानगी दिली, आज पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. असले ‘भंगार खेळ’ खेळण्यापेक्षा सरकारने थेट मराठा समाजाला आरक्षण देऊन खरे राजकारण करावे. गोरगरिबांच्या म लांना आरक्षण दिले, तर मराठा समाज आयुष्यभर सरकारला विसरणार नाही. मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे.

सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूर – आंदोलनादरम्यान आंदोलकांना होणाऱ्या त्रासावरही जरांगे यांनी बोट ठेवले. मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत, पाण्याचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे, असा यामागे डाव आहे, असे ते म्हणाले. यावर बोलताना त्यांनी सरकारला तुम्ही इंग्रजांपेक्षाही क्रूर झाला आहात अशा शब्दांत फटकारले. मी मेलो तरी चालेल जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला. मराठा समाजाची मुले माज घेऊन आलेली नाहीत, तर वेदना घेऊन आली आहेत. मी उपोषण करून मेलो तरी चालेल, पण या मुलांसाठी दुकाने बंद ठेवू नका. अन्यथा, तुमची आम च्याकडे सभा झाली तर आम्हीही पाणी बंद करू, दुकाने बंद करू, असा इशारा जरांगे यांनी दिला.

आता लढाई आरपारची! – ‘ही लढाई आता आरपारची आहे, आम्ही मागे हटणार नाही. एकतर सरकारला आरक्षण द्यावं लागेल किंवा उपोषण करुन मी तरी मरेन, पण आता मागे हटणार नाही. आता फक्त आरक्षण नाही, तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही’, असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular